AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय हॉकी संघाची घोषणा, पाच नव्या खेळाडूंची एन्ट्री

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून आहे. अवघ्या दिवसांवर ही स्पर्धे येऊन ठेपली आहे. दर चार वर्षानंतर ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन केलं जातं. या स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघाचं नेतृत्व हरमनप्रीत सिंग करणार आहे.

Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय हॉकी संघाची घोषणा, पाच नव्या खेळाडूंची एन्ट्री
| Edited By: | Updated on: Jul 12, 2024 | 1:22 PM
Share

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा आता काही दिवसांवर येऊन पोहोचली आहे. ही स्पर्धा 26 जुलैपासून सुरु होणार असून सांगता 11 ऑगस्टला होणार आहे. या स्पर्धेसाठी जगभरातील खेळाडू सज्ज झाले आहेत. गेल्या ऑलिम्पिकमधील चुका सुधारण्याची आणि जेतेपदाचं स्वप्न उराशी बाळगून खेळाडू उतरणार आहेत. 2022 टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघांचं सुवर्ण पदक विजयाचं स्वप्न भंगलं होतं.भारतीय संघाला कास्य पदकावर समाधान मानावं लागलं. आता पुन्हा एकदा टीम इंडिया नव्या जोमाने या स्पर्धेत उतरणार आहे. यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. 16 सदस्यीय संघात पाच नव्या खेळाडूंचा समावेश आहे. जर्मनप्रीत सिंग, संजय, राज कुमार पॉल, अभिषेक, सुखजीत सिंग हे नवखे खेळाडू असून पहिल्यांदाच हॉकी खेळणार आहेत. या संघाचं नेतृत्व पुन्हा एका हरमनप्रीत सिंग याच्याकडे असणार आहे.

भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनी सांगितलं की, ‘पॅरिस ऑलिम्पिकसाठी खेळाडूंची निवड करणे खूप कठीण होते. कारण एकापेक्षा एक सरस खेळाडू आहेत. त्यापैकी एखाद्याची निवड करणं खूपच कठीण होतं. संघात निवडलेले सर्व खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करतील असा विश्वास आहे. यावेळी संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा वज्रमूठ आहे.”

भारतीय संघ ब गटात असून यात बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, न्यूझीलंड, आयर्लंड हे संघ आहेत. उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारतीय संघाला या गटात अव्वल चारमध्ये स्थान मिळवावं लागणार आहे. आता भारतीय संघ कशी कामगिरी करतो आणि कोणतं पदक पटकावतो? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. 27 जुलै भारत विरुद्ध न्यूझीलंड, 29 जुलै भारत विरुद्ध अर्जेंटिना, 30 जुलै भारत विरुद्ध आयर्लंड, 1 ऑगस्ट भारत विरुद्ध बेल्जियम, 2 ऑगस्ट भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असे सामने असतील. 4 ऑगस्टला उपांत्यपूर्व फेरीचे सामने होतील.

भारतीय हॉकी संघ : हरमनप्रीत सिंग (कर्णधार), हार्दिक सिंग (उपकर्णधार), पीआर श्रीजेश (गोलकीपर), मनप्रीत सिंग (मिडफिल्डर), जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, सुमित, संजय, राज कुमार पॉल, समशेर सिंग, विवेक सागर प्रसाद , अभिषेक, सुखजीत सिंग, ललित कुमार उपाध्याय, मनदीप सिंग आणि गुरजंत सिंग.

राखीव खेळाडू: गोलकीपर कृष्ण बहादूर पाठक, मिडफिल्डर नीलकंठ शर्मा आणि बचावपटू जुगराज सिंग.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत