AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 | अवघ्या 7 चेंडूत विराट-डिव्हिलियर्स आणि मॅक्सवेलचं काम तमाम, कोण आहे हरप्रीत?

आयपीएलच्या 14 व्या (ipl 2021) मोसमातील 26 वा सामन्यात हरप्रीत ब्रारने (Harpreet Brar) रॉयल चॅलेंजर्स विरुद्धच्या सामन्यात (RCB) अष्टपैलू कामगिरी केली.

IPL 2021 | अवघ्या 7 चेंडूत विराट-डिव्हिलियर्स आणि मॅक्सवेलचं काम तमाम, कोण आहे हरप्रीत?
आयपीएलच्या 14 व्या (ipl 2021) मोसमातील 26 वा सामन्यात हरप्रीत ब्रारने (Harpreet Brar) रॉयल चॅलेंजर्स विरुद्धच्या सामन्यात (RCB) अष्टपैलू कामगिरी केली.
| Updated on: May 01, 2021 | 12:32 AM
Share

अहमदाबाद | पंजाब किंग्सने (Punjab Kings) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर (Royals Challengers Banglore) 34 धावांनी शानदार विजय मिळवला. या विजयासह पंजाबने या मोसमातील तिसऱ्या विजयाची नोंद केली. पंजाबने बंगळुरुला विजयासाठी 180 धावांचे आव्हान दिले होते. पण पंजाबच्या गोलंदाजांसमोर बंगळुरला20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 145 धावाच करता आल्या. पंजाबकडून कर्णधार केएल राहुलने (K L Rahul) सर्वाधिक 91 धावांची खेळी केली. पण पंजाबच्या विजयाचा हिरो ठरला हरप्रीत ब्रार. हरप्रीत ब्रारने (Harpreet Brar) या सामन्यात बॅटिंग, बोलिंग आणि फिल्डिंग या तिनही आघाड्यांवर यशस्वी कामगिरी केली. या निमित्ताने आपण हरप्रीत ब्रारबद्दल जाणून घेणार आहोत. त्याआधी हरप्रीतने केलेली कामगिरी आपण पाहुयात. (ipl 2021 pbks vs rcb Who is Harpreet Brar who take 3 wickets in 7 balls against Bangalore)

7 चेंडूत दिग्गजांना माघारी धाडलं

हरप्रीतने सामन्यातील 11 वी ओव्हर टाकायला आला. या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर हरप्रीतने बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीचा त्रिफळा उडवला. हरप्रीतने विराटला 35 धावांवर बोल्ड केलं. त्यानंतर पुढील चेंडूवर हरप्रीतने ग्लेन मॅक्सवेलचा काटा काढला. हरप्रीतने मॅक्सवेलला भोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर 13 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर ‘मिस्टर 360’ एबी डी व्हीलियर्सला आऊट केलं. अशा प्रकारे हरप्रीतने आपल्या फिरकीच्या जोरावर बंगळुरुच्या मीडल ऑर्डरला तंबूत धाडलं. हरप्रीतने आपल्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये 19 धावा 3 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे 1 मेडन ओव्हर टाकली. तसेच हरप्रीतने शाहबाद अहमदची कॅच घेतली.

25 धावांची निर्णायक खेळी

त्याआधी हरप्रीतने कर्णधार केएल राहुलसोबत डेथ ओव्हरमध्ये 17 चेंडूत 1 फोर आणि 2 सिक्ससह 25 धावांची नाबाद खेळी केली. एका बाजूला पंजाबने चांगल्या सुरुवातीनंतर विकेट गमावले. मात्र त्यानंतर हरप्रीतने केएलला चांगली साथ दिली. त्याने फटके लगावले. त्यानं कॅप्टन के.एल. राहुलसोबत 61 धावांची भागीदारी केली. हरप्रीतने केलेल्या या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

हरप्रीतविषयी थोडक्यात

हरप्रीतने पंजाबकडून 2019 मध्ये दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. हरप्रीतने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 4 सामने खेळले आहेत. सोबतच क्लब क्रिकेटमध्ये एकाच ओव्हरमध्ये 5 सिक्स लगावण्याची कामगिरीही त्याने केली आहे. म्हणजेच हरप्रीतमध्ये बोलिंगसह बॅटिंग करण्याची क्षमता आहे. हरप्रीतने आतापर्यंत 4 लिस्ट ए सामने खेळले आहेत. तर 19 टी 20 सामन्यांमध्ये त्याने प्रतिनिधित्व केलं आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO | सचिन, रोहितनंतर आणखी एका भारतीय क्रिकेटपटूची कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी आर्थिक मदत

IPL 2021 | गब्बरची जब्बर कामिगिरी, ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैनाला पछाडत शिखर धवनने रचला इतिहास

(ipl 2021 pbks vs rcb Who is Harpreet Brar who take 3 wickets in 7 balls against Bangalore)

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.