RCB vs KKR, IPL 2021 Match 10 Result | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सलग तिसरा विजय, कोलकातावर 38 धावांनी शानदार विजय

आयपीएलच्या 14 व्या पर्वातील दहावा सामना आज तुफान फॉर्मात असणाऱ्या रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुचा सामना आज कोलकाता नाईट रायडर्सशी (Royal Challengers Banglore vs kolkata knight Riders) होत आहे. KKR vs RCB live score IPL 2021

RCB vs KKR, IPL 2021 Match 10 Result | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सलग तिसरा विजय, कोलकातावर 38 धावांनी शानदार विजय
RCB vs KKR Live Streming

चेन्नई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने कोलकाता नाईट रायडर्सवर 38 धावांनी विजय मिळवला आहे. बंगळुरुने कोलकाताला विजयासाठी 205 धावांचे आव्हान दिले होते. मात्र कोलकाताला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 166 धावाच करता आल्या. कोलकाताकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक 31 धावांची खेळी केली. तर बंगळुरुकडून कायले जेमिन्सनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. बंगळुरुचा हा या मोसमातील सलग तिसरा विजय ठरला. (KKR vs RCB live score IPL 2021 Match Royal Challengers Bangalore vs Kolkata knight Riders Scorecard online MA Chidambaram Stadium Chennai in Marathi)

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
 • 18 Apr 2021 19:19 PM (IST)

  बंगळुरुचा सलग तिसरा विजय

  बंगळुरुने कोलकाताला पराभूत करत आयपीएलच्या 14 व्या  मोसमात सलग तिसरा विजय नोंदवला आहे.  बंगळुरुने प्रथम फलंदाजी करत 204 धावा केल्या. त्यामुळे कोलाकाताला विजयासाठी 205 धावांचे आव्हान मिळाले. मात्र कोलकाताला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 166 धावाच करता आल्या.

 • 18 Apr 2021 19:07 PM (IST)

  मोहम्मद सिराजची 19 व्या ओव्हरमध्ये अफलातून गोलंदाजी

  मोहम्मद सिराजची अफलातून गोलंदाजी, 19 व्या ओव्हरमध्ये दिली फक्त 1 धाव

 • 18 Apr 2021 19:05 PM (IST)

  कोलकाताला विजयासाठी 44 धावांची आवश्यकता

  कोलकाताला विजयासाठी 12 चेंडूत 44 धावांची गरज, सामना रंगतदार स्थितीत

 • 18 Apr 2021 19:04 PM (IST)

  कोलकाताला सातवा धक्का

  img

  कोलकाताला सातवा धक्का बसला आहे.  पॅट कमिन्स आऊट झाला आहे.

 • 18 Apr 2021 19:01 PM (IST)

  कोलकाताला सहावा धक्का

  img

  कोलकाताला सहावा धक्का बसला आहे.  शाकिब अल हसन आऊट झाला आहे.

 • 18 Apr 2021 18:56 PM (IST)

  कोलकाताच्या 17 व्या ओव्हरमध्ये 20 धावा

  आंद्रे रसेलने युजवेंद्र चहलच्या बोलिंगवर 17 व्या ओव्हरमध्ये 1 सिक्स आणि 3 चौकारांसह 20 धावा फटकावल्या आहेत.

 • 18 Apr 2021 18:54 PM (IST)

  रसेलचे 3 चेंडूत 3 फोर

  img

  रसेलने 17 व्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर सिक्स लगावला. त्यानंतर पुढील 3 चेंडूत सलग 3 चौकार लगावले.

 • 18 Apr 2021 18:51 PM (IST)

  आंद्रे रसेलचा सिक्स

  img

  आंद्रे रसेलने 17 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर युजवेंद्र चहलच्या बोलिंगवर शानदार सिक्स खेचला आहे.

 • 18 Apr 2021 18:46 PM (IST)

  कोलकाताला विजयासाठी 30 चेंडूत 84 धावांची आवश्यकता

  कोलकाताला विजयासाठी 30 चेंडूत 84 धावांची आवश्यकता आहे. मैदानात आंद्रे रसेल आणि शाकिब अल हसल ही जोडी मैदानात खेळत आहेत.

 • 18 Apr 2021 18:39 PM (IST)

  कोलकाताला पाचवा धक्का

  img

  कोलकाताला पाचवा झटका बसला आहे. कर्णधार इयोन मॉर्गन आऊट झाला आहे. मॉर्गन 29 धावांवर आऊट झाला.

 • 18 Apr 2021 18:32 PM (IST)

  कोलकाता 100 पार

  शाकिब अल हसनने सिक्स खेचला आहे. यासह कोलकाताने 100 धावांचा टप्पा पार केला आहे.

 • 18 Apr 2021 18:22 PM (IST)

  कोलकाताला विजयासाठी 10 ओव्हरमध्ये 122 धावांची आवश्यकता

  कोलकाताने 10 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 83 धावा केल्या आहेत. त्यामुळे कोलकाताला विजयासाठी उर्वरित 10 ओव्हरमध्ये 122 धावांची आवश्यकता आहे.

 • 18 Apr 2021 18:20 PM (IST)

  कोलकाताला मोठा धक्का

  img

  कोलकाताला मोठा धक्का बसला आहे. अनुभवी दिनेश कार्तिकला युजवेंद्र चहलने एलबीडबल्यू आऊट केलं आहे.

 • 18 Apr 2021 18:09 PM (IST)

  कोलकाताला तिसरा धक्का

  img

  कोलकाताला तिसरा धक्का बसला आहे. नितीश राणा आऊट झाला आहे. नितीशने 18 धावांची खेळी केली.

 • 18 Apr 2021 18:05 PM (IST)

  कोलकाताच्या पावर प्लेमध्ये 57 धावा

  कोलकाताने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 57 धावा केल्या आहेत. कोलकाताने शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठीची विकेट गमावली. मैदानात नितीश राणा आणि कर्णधार इयोन मॉर्गन ही जोडी खेळत आहे.

 • 18 Apr 2021 18:02 PM (IST)

  कोलकाताला दुसरा धक्का

  कोलकाताने दुसरी विकेट गमावली आहे. राहुल त्रिपाठी मोठा फटका मारण्याच्या नादात कॅच आऊट झाला आहे. राहुलने 25 धावांची खेळी केली.

 • 18 Apr 2021 17:42 PM (IST)

  कोलकाताला पहिला धक्का

  img

  डॅन ख्रिस्टियनने शानदार कॅच घेत कोलकाताला पहिला धक्का दिला आहे. कोलकाताला शुबमन गिलच्या रुपात पहिला धक्का बसला आहे. शुबमन गिलने फटकेबाजी करत सुरुवात केली होती. त्याने दुसऱ्या ओव्हरमधील दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर कायले जेमिन्सनच्या गोलंदाजीवर सलग 2 सिक्स खेचले. पुढील चेंडूवर शुबमनने फटका मारला होता. मात्र तिथे असेलल्या डॅनियल ख्रिस्टियनने हवेत झेपावत शानदार कॅच घेतला. शुबमनने 21 धावांची खेळी केली.

 • 18 Apr 2021 17:29 PM (IST)

  कोलकाताच्या बॅटिंगला सुरुवात

  कोलकाताच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. कोलकाताकडून नितीश राणा आणि शुबमन गिल ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे. कोलकाताला विजयासाठी 205 धावांची आवश्यकता आहे.

 • 18 Apr 2021 17:19 PM (IST)

  कोलकाताला विजयासाठी 205 धावांचे आव्हान

  एबी डी व्हीलियर्सची फटकेबाजी आणि ग्लेन मॅक्सवेलच्या अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने कोलकाता नाईट रायडर्सला विजयासाठी 205 धावांचे आव्हान दिले आहे. बंगळुरने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 204 धावा केल्या. बंगळुरुकडूने मॅक्सवेलने सर्वाधिक 78 धावा केल्या. तर एबीडीने नाबाद 76 धावांची खेळी केली.

 • 18 Apr 2021 17:10 PM (IST)

  एबी डी व्हीलियर्सने शानदार अर्धशतक पूर्ण

  img

  सिक्स खेचत एबी डी व्हीलियर्सने शानदार अर्धशतक पूर्ण केलं आहे. एबीने अवघ्या 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आहे.

 • 18 Apr 2021 17:01 PM (IST)

  बंगळुरुला चौथा धक्का

  img

  बंगळुरुने चौथी विकेट गमावली आहे. आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल आऊट झाला आहे. मॅक्सवेलने 49 चेंडूत 9 फोर आणि 3 सिक्ससह 78 धावांची खेळी केली. ग्लेनने देवदत्त पडीक्कल आणि एबी डी व्हीलियर्ससोबत अर्धशतकी भागीदारी केली.

 • 18 Apr 2021 16:30 PM (IST)

  बंगळुरुला तिसरा धक्का

  img

  बंगळुरुने तिसरी विकेट गमावली आहे. देवदत्त पडीक्कल आऊट झाला आहे. प्रसिद्ध कृष्णाने टाकलेल्या चेंडूवर देवदत्तने मोठा फटका मारला. मात्र त्यात तो अपयशी ठरला. देवदत्त कॅच आऊट झाला. देवदत्तने 25 धावांची खेळी केली.

 • 18 Apr 2021 16:19 PM (IST)

  ग्लेन मॅक्सवेलचे झंझावाती अर्धशतक

  ग्लेन मॅक्सवेलचे झंझावाती अर्धशतक लगावलं आहे. मॅक्सवेलने 28 चेंडूत अर्धशतक झळकावलं. या दरम्यान मॅक्सवेलने सलामीवीर देवदत्त पडीक्कलसोबत अर्धशतकी भागीदारी करत बंगळुरुचा डाव सावरला.

 • 18 Apr 2021 16:15 PM (IST)

  बंगळुरुची तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

  ग्लेन मॅक्सवेल आणि देवदत्त पडीक्कल या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे. बंगळुरुची खराब सुरुवात झाली. बंगळुरुने दुसऱ्या ओव्हरमध्ये कर्णधार विराट कोहली आणि रजत पाटीदारची विकेट गमावली. त्यामुळे बंगळुरुवर दबाव निर्माण झाला होता. पण ग्लेन मॅक्सवेलने जोरदार फटकेबाजी करत संघाचा डाव सावरला. तसेच पडीक्कलनेही त्याला चांगली साथ दिली. 

 • 18 Apr 2021 15:59 PM (IST)

  बंगळुरुच्या पावर प्लेमध्ये 45 धावा

  बंगळुरुने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून  45 धावा केल्या आहेत. बंगळुरुने 6 व्या ओव्हरमध्ये 17 धावा चोपल्या. मैदानात ग्लेन मॅक्सवेल आणि देवदत्त पडीक्कल खेळत आहेत.

 • 18 Apr 2021 15:55 PM (IST)

  मॅक्सवेलचा खणखणीत सिक्स

  img

  बंगळुरुचा आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने 6 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर शाकीब अल हसनच्या गोलंदाजीवर सिक्स लगावला आहे.

 • 18 Apr 2021 15:42 PM (IST)

  बंगळुरुला दुसरा धक्का

  img

  बंगळुरुला दुसरा धक्का बसला आहे. रजत पाटीदार आऊट झाला आहे.

 • 18 Apr 2021 15:41 PM (IST)

  बंगळुरुला पहिला धक्का

  img

  बंगळुरुला पहिला धक्का बसल आहे.  कर्णधार विराट कोहली आऊट झाला आहे.

 • 18 Apr 2021 15:34 PM (IST)

  बंगळुरुच्या बॅटिंगला सुरुवात

  बंगळुरुच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. कर्णधार विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल ही सलामी जोडी मैदानात खेळत आहेत.

 • 18 Apr 2021 15:23 PM (IST)

  कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन

  ऑएन मॉर्गन (कर्णधार), नितीश राणा, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, शाकिब अल हसन, दिनेश कार्तिक, आंद्रे रसल, पैट कमिंस, हरभजन सिंह, वरुण चक्रवर्ती आणि प्रसिद्ध कृष्णा.

 • 18 Apr 2021 15:21 PM (IST)

  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग इलेव्हन

  विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, एबी डिविलियर्स, शाहबाज अहमद, ग्लेन मैक्सवेल, वाशिंगटन सुंदर, रजत पाटिदार, मोहम्मद सिराज, युज़वेंद्र चहल ,हर्षल पटेल आणि कायल जेमिन्सन.

 • 18 Apr 2021 15:05 PM (IST)

  KKR vs RCB : टॉस जिंकून बंगळुरुचा बॅटिंग करण्याचा निर्णय

  टॉस जिंकून रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुने बॅटिंग करण्याचा निर्णय निर्णय घेतला आहे. त्यामुळे साहजिक कोलकात्याला प्रथम फिल्डिंग करावी लागणार आहे.

 • 18 Apr 2021 15:02 PM (IST)

  KKR vs RCB : थोड्याच वेळात टॉस होणार

  रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याचा थोड्याच वेळात टॉस होणार आहे.

Published On - 7:19 pm, Sun, 18 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI