AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Oh My God..! आर प्रज्ञानंदने फ्रीस्टाईल बुद्धिबळ स्पर्धेत मॅग्नस कार्लसनला दिली मात, 39 डावातच खेळ खल्लास

लास वेगासमध्ये सुरु असलेल्या फ्रीस्टाईल बुद्धिबळ ग्रँड स्लॅम स्पर्धेत भारताने पुन्हा एकदा झेंडा रोवला आहे. युवा बुद्धीबळ ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद याने 39 डावातच जगातील नंबर एक मॅग्नस कार्लसनला चीतपट केलं. चौथ्या फेरीत त्याला पराभवाची चव चारली.

Oh My God..! आर प्रज्ञानंदने फ्रीस्टाईल बुद्धिबळ स्पर्धेत मॅग्नस कार्लसनला दिली मात, 39 डावातच खेळ खल्लास
आर प्रज्ञानंदने फ्रीस्टाईल बुद्धिबळ स्पर्धेत मॅग्नस कार्लसनला दिली मात, 39 डावातच खेळ खल्लासImage Credit source: PTI
| Updated on: Jul 17, 2025 | 4:57 PM
Share

जागतिक पातळीवर नंबर 1 चा मुकूट मिरवणाऱ्या मॅग्नस कार्लसनला मागच्या काही सामन्यात भारतीय बुद्धीबळपटूंकडून पराभवाची चव चाखावी लागली आहे. विश्वविजेत्या डी गुकेश याने त्याला चीतपट केलं होतं. आता युवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर प्रज्ञानंदने त्याला पराभूत केलं आहे. लास वेगासमध्ये फ्रीस्टाईल बुद्धीबळ ग्रँड स्लॅम स्पर्धेत प्रज्ञानंदने हा विजय मिळवला आहे. प्रज्ञानंदच्या बुद्धीबळ स्पर्धेच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा विजय आहे. कारण त्याने फक्त 39 डावातच खेळ खल्लास केला. प्रज्ञानंदने चौथ्या फेरीत 10 मिनिटं आणि 10 सेकंदात कार्लसनचा पराभव केला. या सामन्यात प्रज्ञानंदची मजबूत पकड दिसून आली. त्याने 93.9 टक्के अचूकता दाखवली. तर कार्लसनला फक्त 84.9 टक्के सामना आपल्या ताब्यात ठेवण्यात यश आलं. सरते शेवटी प्रज्ञानंद कार्लसनवर भारी पडला. आर प्रज्ञानंदने आठ खेळाडूंच्या व्हाईट ग्रुपमध्ये 4.5 गुणांसह संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत प्रज्ञानंद क्लासिकल, रॅपिड आणि ब्लिट्झ या तिन्ही प्रकारात विजयी ठरला आहे.

आर प्रज्ञानंदने फ्रीस्टाइल ग्रँड स्लॅम टूरच्या टॉप ब्रॅकेटच्या उपांत्य पूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. दुसरीकडे, कार्लसनवर या पराभवाचा इतका परिणाम झाला की त्यातून तो सावरूच शकला नाही. पुढच्या फेरीत वेस्ली सो विरुद्ध पराभूत झाला आणि अमेरिकेच्या एरोनिययनने टॉप ब्रॅकेटमध्ये जेतेपदाच्या शर्यतीतून आऊट झाला. कार्लसनने यापूर्वी पॅरिस आणि कार्लजूएतील फ्रीस्टाईल स्पर्धेचं ग्रँडस्लॅम जिंकलं आहे. दरम्यान, दुसऱ्या गटातून भारता एरिगासी हा उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यात यशस्वी ठरला आहे. उपांत्यपूर्व फेरीत प्रज्ञानंदचा सामना अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाशी, तर एरिगासीचा सामना अब्दुसत्तोरोव्ह नोदिरबेकशी होणार आहे.

भारताचे ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद जेतेपदापासून फक्त तीन पावलं दूर आहे. उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम फेरी अशी लढत असणार आहे. फ्रीस्टाइल बुद्धिबळाचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना गुरुवारी लास वेगासमध्ये खेळला जाईल. यानंतर वरच्या श्रेणीतील पराभूत खेळाडू खालच्या श्रेणीत जातील आणि विजेते खेळाडू 2,00,000 अमेरिकन डॉलर्सच्या पहिल्या बक्षीसासाठी स्पर्धा करत राहतील.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.