PHOTO : टेनिस स्टार अडकली लग्न बंधनात, 12 वर्षांनी मोठ्या प्रियकरासोबत रचला विवाह

जागतिक टेनिसमधील माजी वर्ल्ड नंबर वन सिमोना हालेपने 41 वर्षीय व्यावसायिक टोनी ल्यूरक याच्याशी विवाह रचला आहे. रोमानिया येथे या दोघांनी लग्न केलं आहे. या दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहेत.

1/5
दिग्गज टेनिसपटू आणि जागतिक टेनिसमधील माजी नंबर एकची खेळाडू सिमोना हालेप (Simona Haleo) नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. रोमानियाच्या 29 वर्षीय या खेळाडूने तिचा प्रियकर आणि व्यावसायिक टोनी ल्यूरकसोबत रोमानिया येथे लग्न केलं आहे.

2/5
हालेपने मागील आठवड्यातच लग्न करणार असल्याचा खुलासा केला होता. यूएस ओपनमधून परतत असताना तिने विमानतळावर फॅन्सना याबाबत माहिती दिली होती. तिने यावेळी हा क्षण माझ्यासाठी फार महत्त्वाचा असल्याचं सांगितलं.

3/5
सिमोना हालेपचा नवरा टोनी हा एक व्यावसायिक असून तिच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठा आहे. टेलेकॉमस्पोर्टच्या वृत्तानुसार या लग्नासाठी इली नास्टेस, इओन टिरिएक असे खेळाडूही उपस्थित होते. तसेच रोमानियाचे राष्ट्रपती क्लॉस इओहान्निसही उपस्थित होते.

4/5
सिमोना हालेपने दुखापतीच्या कारणास्तव टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला नव्हता.  त्यानंतर युएसओपनमध्येही ती तिसऱ्या राउंडपर्यंतच पोहचू शकली. तिला यूक्रेनच्या एलिना स्वितोलिनाने 6-3, 6-3 च्या फरकाने मात दिली.

5/5
सिमोना हालेप रोमानियाच्या दिग्गज टेनिस खेळाडूंपैकी एक आहे. तिने आतापर्यंत दोन ग्रँड स्लॅम पटकावले आहेत. यात पहिला ग्रँड स्लॅम 2018 मध्ये फ्रेंच ओपनच्या रुपात तर दुसरा विम्बल्डनच्या रुपात जिंकला आहे. 2017 आणि 2019 मध्ये जागतिक रँकिंगमध्ये नंबर एकला होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI