“कर्णधार म्हणून विराटने ICC ची एकही ट्रॉफी जिंकली नाही पण…”

कर्णधार म्हणून विराटने ICC ची एकही ट्रॉफी जिंकली नाही पण...
विराट कोहली आणि पार्थिव पटेल

विराट कोहलीकडे आता कर्णधार म्हणून आयसीसीचं पहिलं विजेतेपद जिंकण्याची संधी आहे. त्याने आयसीसीच्या अनेक स्पर्धांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे, परंतु आताची स्पर्धा त्याच्यासाठी मोठं आव्हान असणार आहे, असं पार्थिव पटेल म्हणाला. (Parthiv Patel Comment On Virat kohli World Test Championship Final 2021)

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Akshay Adhav

Jun 06, 2021 | 11:11 AM

मुंबईटीम इंडियाचे (Team India) सगळे खेळाडू इंग्लंडमध्ये (India Tour of England) पोहोचले आहेत. 2 जून रोजी मध्यरात्री भारतीय संघांच्या खेळाडूंनी इंग्लंडसाठी उड्डाण घेतलं. 3 जून रोजी संघ लंडनमध्ये पोहोचला. तिथून साऊथहॅम्प्टन… सध्या सगळे खेळाडू कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियम आणि अटींच्या अधिन राहून क्वारंटाईन आहेत. कधी एकदा क्वारंटाईन पिरियड संपतो आणि सराव सत्र सुरु होतं, याची वाट भारतीय खेळाडू पाहत आहे. एकंदरितच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची जशी उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे तशी ती खेळाडूंना देखील आहे. अशातच भारतीय संघाचा माजी क्रिकेटर पार्थिव पटेल (Parthiv Patel) याने मोठं वक्तव्य केलं आहे. विराट कोहलीने (Virat kohli) आतापर्यंत आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकली नाही, पण त्याच्याजवळ आता संधी आहे ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याची… अशा शब्दात पार्थिवने विराटला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.  (Parthiv Patel Comment On Virat kohli World Test Championship Final 2021)

पार्थिव पटेल काय म्हणाला?

विराट कोहलीकडे आता कर्णधार म्हणून आयसीसीचं पहिलं विजेतेपद जिंकण्याची संधी आहे. त्याने आयसीसीच्या अनेक स्पर्धांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे, परंतु आताची स्पर्धा त्याच्यासाठी मोठं आव्हान असणार आहे. भारताने त्याच्या नेतृत्वात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यास कोहलीची ही मोठी कामगिरी ठरेल, असं पार्थिव म्हणाला.

कर्णधार म्हणून ICC स्पर्धेमध्ये विराटची कामगिरी

कोहलीने 2017 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2019 मध्ये झालेल्या 50 षटकांच्या विश्वचषकात भारताचे नेतृत्व केलं. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताला पाकिस्तानकडून 180 धावांनी पराभव पत्करावा लागला होता तर वर्ल्ड कप 2019 च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडकडून 18 धावांनी भारत पराभूत झाला होता.

अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला, टीम इंडियाचा 72 तासांचा विशेष सिक्रेट प्लॅन

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या संघात इंग्लंडमध्ये 18 जून ते 22 जूनच्या दरम्यान खेळला जाईल. अंतिम सामन्यासाठीची तयारी टीम इंडिया (Inidan Cricket Team) बंद खोलीत करणार आहे. यासाठी संघाने एक ‘सिक्रेट प्लॅन’ तयार केला आहे. त्या प्लॅननुसार संपूर्ण टीम 72 तास बंद खोलीत आहे. न्यूझीलंडच्या खेळाडूंची सर्व रणनीती लक्षपूर्वक अभ्यासली जात आहे. प्रत्येक खेळाडूची खेळण्याची पद्धत महत्त्वाचे शॉट या साऱ्याचा अभ्यास यावेळी करण्यात येत आहे.

(Parthiv Patel Comment On Virat kohli World Test Championship Final 2021)

हे ही वाचा :

चॅपेल म्हणाले, ‘आताच्या घडीचा अश्विन सर्वश्रेष्ठ गोलंदाज’; मांजरेकर म्हणाले, ‘मी सहमत नाही!’

वसीम अक्रम, ज्याने भल्याभल्या दिग्गजांना आऊट केलं, तो बॉलिवूडच्या कोणत्या अभिनेत्रीसमोर बोल्ड झाला होता?

पाईपच्या कारखान्यात कामाला होता, माजी क्रिकेटरची नजर पडली, नशीब उजळलं, त्याची उंची म्हणजे बुर्ज खलीफा!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें