Vinesh Phogat : ‘धाकड गर्ल’ विनेश फोगाटच्या नावे रेकॉर्ड्सची मोठी लिस्ट, कुस्तीतील हे विक्रम माहीत आहेत का ?

वाढलेल्या वजनामुळे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतून बाहेर पडावे लागलेल्या विनेश फोगाटने अखेर कुस्तीतून संन्यास घेत असल्याचे जाहीर केले. तिच्या एक्झिटमुळे भारताचे ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदक हुकले असले तरीही विनेशने अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत यश मिळवले आहे. करिअर दरम्यान अनेक वादही झाले.

Vinesh Phogat :  'धाकड गर्ल' विनेश फोगाटच्या नावे रेकॉर्ड्सची मोठी लिस्ट, कुस्तीतील हे विक्रम माहीत आहेत का ?
Follow us
| Updated on: Aug 08, 2024 | 8:55 AM

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये घडलेल्या प्रकारारनंतर बाहेर पडाव्या लागलेल्या विनेश फोगोटने अखेर कुस्तीतून संन्यास घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. ऑलिम्पिकमधील तिच्या एक्झिटमुळे देशवासीय दु:खी असतानाच आता तिच्या या निरोपामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. संन्यास घेण्यापूर्वी तिने पॅरिसहून भारतात येण्याचीहील वाट पाहिली नाही. ‘ कुस्ती जिंकली, मी हरले. अलविदा कुस्ती’, असं ट्विट करत विनेशने तिचा निर्णय जाहीर केला. तिच्या या निर्णयाचा पॅरिस ऑलिम्पिकमधील घटनेशी संदर्भ जोडला जात आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या विनेशला जास्त वजनामुळे अपात्र ठरवण्यात आले होते, त्यानंतर तिच्या पदक जिंकण्याच्या सर्व शक्यता नष्ट झाल्या. . तिच्या एक्झिटमुळे भारताचे ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदक हुकले असले तरीही विनेशने अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत यश मिळवले आहे. विनेश फोगटची कारकीर्द यश आणि वाद यांचा अनोखा मेळ आहे.

विनेश फोगाटच्या नावे अनेक रेकॉर्ड्स

कुस्तीला अलविदा करण्यापूर्वी विनेश फोगाटने एक असा विक्रम प्रस्थापित केला आहे, जो मोडणे हे इतर कोणत्याही भारतीय महिला कुस्तीपटूसाठी मोठे आव्हान असेल. विनेशने 3 ऑलिम्पिक खेळून हा विक्रम केला आहे. वास्तविक, 3 ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आहे.

रिओ आणि टोकियोनंतर विनेश पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली होती. मात्र, तिला यापैकी कोणत्याही स्पर्धेत पदक जिंकता आले नाही. रिओतील सामन्यादरम्यान झालेली दुखापत तिच्या विजयातील मार्गात अडथळा ठरली आणि पॅरिसमधील अपात्रतेशी संबंधित वाद तर ताजाच आहे. तर, टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिला उपांत्यपूर्व फेरीतूनच बाहेर पडावे लागले होते.

मिळवलं मोठं यश

ऑलिम्पिक स्पर्धेत तिला पदक मिळालं नसलं तरी विनेशने आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ आणि जागतिक अजिंक्यपद यांसारख्या स्पर्धांमध्ये अनेक पदके जिंकली आहेत. 2014, 2018 आणि 2022 मध्ये ती कॉमनवेल्थ चॅम्पियन बनली होती. तर 2018 मध्ये, ती आशियाई चॅम्पियन बनली, तिने 50 किलो स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. विनेशने वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या मॅटवर 2 कांस्यपदके जिंकली आहेत. 2019 आणि 2022 मध्ये तिला हे यश मिळाले. विनेश फोगाटने 2013 मध्ये यूथ रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.

कारकिर्दीला वादांचीही किनार

29 वर्षीय विनेश फोगटने कुस्तीमध्ये अनेक यशोगाथा लिहिल्या तरी तिच्या कारकिर्दीत अनेक वादही झाले. सर्वात मोठा आणि प्रसिद्ध वाद हा गेल्या वर्षीचा आहे. जानेवारी 2023 मध्ये तिने जेव्हा तिने तिच्या सहकारी कुस्तीपटूंसह ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन केलं होतं. त्यांना काढून टाकण्याची मागणी करत आंदोलन करण्यात आलं होतं. विनेश आणि तिच्या सहकाऱ्यांनी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर महिला कुस्तीपटूंकडून विनयभंग, लैंगिक शोषण आणि मनमानी केल्याचा आरोप केला होता.

या वादाने मोठ्या आंदोलनाचे रूप धारण केले. अनेक खेळाडू रस्त्यावर उतरले होते. यावेळी त्यांची पोलिसांशी झटापटही झाली. या आंदोलनात विनेशलाही दुखापत झाली, त्यामुळे ती अनेक दिवस कुस्तीपासून दूर राहिली. पण, जेव्हा ती परतली तेव्हा पॅरिस ऑलिम्पिकसाठी तिने कसून तयारी केली.

विनेश ही कुस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या फोगाट कुटुंबातील सदस्य आहे. तिने तिच्या कारकिर्दीत जेवढे दु:ख सोसले, तेवढेच दुःख तिने कौंटुंबिक जीवनातही भोगले. ती 9 वर्षांची असताना तिने वडीलांना गमावलं. वडिलांच्या निधनाने दु:खाचा डोंगर कोसळला असतानाच तिची आईदेखील आजारी पडली. मात्र, एवढे होऊनही विनेश डगमगली नाही. तिने कठोर मेहनत करत नाव कमावलं आणि देशाचं नावही उंचावलं.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.