AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: एकही मिनिटंही वाया घालवू नका…! विराट कोहलीने संघ सहकाऱ्यांना दिला कानमंत्र

आयपीएल 2026 पुन्हा गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु जेतेपद कायम राखण्यासाठी उतरणार आहे. यासाठी संघाने जोरदार तयारी सुरू केली आहे. असं असताना विराट कोहलीने संघ सहकाऱ्यांना कानमंत्र दिला आहे.

IPL 2026: एकही मिनिटंही वाया घालवू नका...! विराट कोहलीने संघ सहकाऱ्यांना दिला कानमंत्र
IPL 2026: एकही मिनिटंही वाया घालवू नका...! विराट कोहलीने संघ सहकाऱ्यांना दिला कानमंत्रImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Mar 21, 2026 | 7:50 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे.आयपीएल २०२६ चा पहिला सामना बंगळूरु येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यापूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जोरदार तयारी सुरू केली आहे. यंदाही जेतेपदाचं स्वप्न उराशी बाळगून आरसीबीचा संघ मैदानात उतरणार आहे. यासाठी विराट कोहली स्वत: मैदानात खेळाडूंना प्रेरणा देताना दिसला. आरसीबीने अधिकृत एक्स खात्यावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात विराट कोहली गंभीरपणे संघ सहकाऱ्यांना सल्ला देताना दिसत आहे. “गेल्या वर्षी आपण जे काही मिळवले, त्यासाठी आपण गेल्या दोन-तीन हंगामात कठोर परिश्रम घेतले आहेत. यावेळी ते खूप कठीण असणार आहे, कारण इतर संघ पूर्ण ताकदीनिशी आपल्यावर तुटून पडतील.”, असं विराट कोहलीने सांगितलं.

आरसीबीचं नेतृत्व गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही रजत पाटिदाराच्या हातात आहे. पण संघाचा मुख्य आधारस्तंभ हा विराट कोहलीच असणार आहे. यावेळी विराट कोहली आपल्या सहकाऱ्यांना म्हणाला की, “आपण हे दिवस वाया घालवणार नाही. आपण आघाडीवर राहू. त्यामुळे आता सज्ज व्हा. कोणत्याही सत्रातील एकही मिनिट वाया घालवू नका. पुढील अडीच महिन्यांत आपल्याला 120 टक्के योगदान द्यावे लागेल.”

दुसरीकडे, आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी स्पर्धेपूर्वी संघाचं विश्लेषण करून सांगितलं. मिनी लिलावानंतर संघ आणखी मजबूत झाल्याचं सांगितलं. नवीन खेळाडूंचा संघात भरणा झाला असून संघासाठी ही जमेची बाजू आहे. आरसीबीने मिनी लिलावात वेंकटेश अय्यर, मंगेश यादव, जॉर्डन कॉक्स, विकी ओस्तवाल आणि सात्विक देसवाल यांसारख्या खेळाडूंना संघात सामील करून घेतले आहे. अँडी फ्लॉवर यावेळी म्हणाले की, “आमचा पहिला सामना इथे चिन्नास्वामीवर आहे. लय पकडण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.”

Follow Us
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?.
राऊत यांचे आरोप बिनबुडाचे, माझं खातं खरात कसे चालवणार? - दीपक केसरकर
राऊत यांचे आरोप बिनबुडाचे, माझं खातं खरात कसे चालवणार? - दीपक केसरकर.
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण.
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त.
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड.
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?.
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?.
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे.
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?.