AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK vs DC IPL 2021 | गुरु शिष्याची जोडी आमनेसामने, दिल्ली विजयी सलामी करणार की अनुभवी चेन्नई जिंकणार?

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL) दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्स (chennai super kings) विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स (delhi capitals) यांच्यात खेळवण्यात येणार आहे.

CSK vs DC IPL 2021 | गुरु शिष्याची जोडी आमनेसामने, दिल्ली विजयी सलामी करणार की अनुभवी चेन्नई जिंकणार?
आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL) दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्स (chennai super kings) विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स (delhi capitals) यांच्यात खेळवण्यात येणार आहे.
| Updated on: Apr 10, 2021 | 4:03 PM
Share

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) दुसरा सामना आज (10 एप्रिल) खेळवण्यात येणार आहे. ही मॅच चेन्नई सुपर किंग्जस विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) ही गुरु शिष्याची जोडी आमनेसामने असणार आहे. एकाबाजूला चेन्नईच्या नेतृत्वाची जबाबदारी धोनीच्या खांद्यावर आहे. तर दिल्लीच्या कर्णधारपदाची धुरा युवा रिषभकडे असणार आहे. त्यामुळे या सामन्यात गुरु शिष्य यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. हा सामना संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये सुरु होणार आहे. (who will win chennai super kings vs delhi capitals ipl match today 10 april 2021 in marathi)

हेड टु हेड रेकॉर्ड

आयपीएलच्या इतिहासात हे दोन्ही संघ एकूण 23 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये धोनीची अनुभवी चेन्नई वरचढ राहिलेली आहे. चेन्नईने 15 सामन्यात दिल्लीवर विजय मिळवला आहे. तर दिल्लीने चेन्नईला 8 सामन्यात उपट दिली आहे.

कर्णधारांमध्ये ‘काटे की टक्कर’

पंत आणि धोनी हे दोन्ही संघांचे कर्णधार आहेत. हे दोघे आपल्या संघाकडून नेतृत्व, फलंदाजी आणि विकेटकीपिंग अशा तिन्ही आघाड्यांवर योगदान देतात. त्यामुळे या सामन्यात या तिन्ही आघाड्यांवर कोण यशस्वी ठरणार, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

मागील पर्वातील कामगिरी

दिल्लीसाठी आयपीएलचं 13 वा पर्व शानदार राहिलं होतं. दिल्ली गत मोसमात उपविजेता संघ ठरला होता. तर चेन्नईसाठी 13 वा हंगाम खराब ठरला होता. चेन्नईने आयपीएलच्या पहिल्या 12 व्या मोसमापर्यंत प्लेऑफमध्ये धडक मारली होती. पण चेन्नईचे 13 वा मोसमातील आव्हान हे साखळी फेरीतच संपुष्ठात आले होते. त्यामुळे चेन्नईसाठी 13 मोसम खराब ठरला होता.

पंतची शिलेदार सज्ज

या हंगामातील पहिल्या सामन्यासाठी दिल्ली सज्ज आहे. दिल्लीच्या ताफ्यात शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, स्टीव स्मिथ आणि पंतसारखे आक्रमक फलंदाज आहेत. त्यामुळे दिल्लीची बॅटिंग साईड अगदी मजबूत आहे. तर गोलंदाजीची जबाबदारी ही इशांत शर्मा, खगिसो रबाडा, उमेश यादव आणि ख्रिस वोक्सवर असेल. फिरकीची जबाबदारी आर अश्विन आणि अमित मिश्राकडे असेल.

अनुभवी चेन्नई

चेन्नई आयपीएलमधील सर्वात अनुभवी संघ आहे. तसेच या मोसमात मिस्टर आयपीएल सुरेश रैनाचे पुनरागमन झालं आहे. त्यामुळे चेन्नईची बाजू मजबूत झाली आहे. चेन्नईच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजाची जबाबदारी रुतुराज गायकवाड, फॅफ डु प्लेसी आणि अंबाती रायुडूवर असेल.

तर मध्य क्रमात सॅम करन, मोईन अली आणि धोनी यांच्यावर ही जबाबदारी असणार आहे. त्यामुळे या सामन्यात अनुभवी चेन्नई बाजी मारणार की युवा दिल्ली विजयी सलामी देणार, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2021 DC vs CSK Live Streamimg : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, सामना कधी, कुठे, केव्हा?

IPL 2021 : पहिली मॅच नाही तर चॅम्पियनशीप जिंकणं महत्त्वाचं, रोहितने रणशिंग फुकलं!

(who will win chennai super kings vs delhi capitals ipl match today 10 april 2021 in marathi)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.