काय सांगता iPhone 11 Pro फक्त 66,999 रुपयांत ? पाहा काय आहे डील

जगभरात चर्चा असणाऱ्या या फोनला भारतातसुदधा प्रचंड मागणी आहे. प्रचंड मागणी प्रमाणेच हा फोन त्याच्या किंमतीमुळेसुद्धा ओळखला जातो. अशातच आता हा फोन भारतात 70 हजार रुपयांना मिळणार आहे.

काय सांगता iPhone 11 Pro फक्त 66,999 रुपयांत ? पाहा काय आहे डील


मुंबई : जगातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय मोबाईल कंपनी Appleने 10 सप्टेंबर कॅलिफोर्नियाच्या क्यूपर्टिनो येथे एका इव्हेंटदरम्यान iPhone 11 सीरिज लाँच केली. या सीरिजदरम्यान, कंपनीने iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Max हे नवे iPhone लाँच केले. जगभरात चर्चा असणाऱ्या या फोनला भारतातसुद्धा प्रचंड मागणी आहे. प्रचंड मागणी प्रमाणेच हा फोन त्याच्या किंमतीमुळेसुद्धा ओळखला जातो. अशातच आता हा फोन भारतात 70 हजार रुपयांना मिळणार आहे. आता सेकंड हॅन्ड iPhone 11 Pro हा फोन 70 हजार रुपयांना मिळणार आहे. ऑमेझॉन आणि इतर सोशल प्लॅटफॉर्मवर या फोनची किंमत 1 लाखापर्यंत आहे.

iPhone 11 Pro सीरिजमध्ये काय आहे खास?

iPhone 11 Pro ची संपूर्ण बॉडी सर्जिकल ग्रेड स्टेनलेस स्टीलने बनलेली आहे.

iPhone 11 Proचा डिस्प्ले

iPhone 11 Pro मध्ये सुपर रेटिना XDR डिस्प्ले देण्यात आला आहे.iPhone 11 Pro मध्ये 5.8 इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे.

iPhone 11 Pro चा कॅमेरा

या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असेल. फोनच्या बॅकमध्ये 12-12 मेगापिक्सलचे तीन 3 कॅमरे असतील. यामध्ये पहिला 12 मेगापिक्सलचा वाईड कॅमेरा, दुसरा 12 मेगापिक्सलचा टेलीफोटो लेन्स आणि तिसरा 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड फोटोग्राफी लेन्स असेल.या स्मार्टफोनमध्ये A13 बायोनिक चिपसेट आहे.

iPhone 11 Pro चा एक्स्ट्रा बॅटरी लाईफ

iPhone 11 Pro मध्ये iPhone XS च्या तुलनेत 4 तासाची एक्स्ट्रा बॅटरी लाईफ देण्यात आली आहे.

कुठे मिळेल APPLE iPhone 11 PRO ? – कुठे मिळतेय शानदार डील?

APPLE iPhone 11 PRO तुम्हाला कॅशिफाई नावच्या वेबसाइटवरून विकत घेतला जावू शकतो. या वेबसाइटवर या फोनची किंमत 66,999 रुपये दाखवली आहे. या भागात EMI चा पर्याय देखील देण्यात आला आहे. हा एक उत्तम स्थितीत असलेला सेकंड हॅन्ड फोन आहे. या फोनच्या बाबतीतील सर्व माहीत फोनच्या खाली देण्यात आली आहे. तसेच यूजर्सला या फोनवर सहा महिन्यांची वॉरंटी देण्यात आली आहे.

इतर बातम्या :

OnePlus 9RT ची किंमत आणि फीचर्स लीक, ‘या’ दिवशी होणार लाँच, जाणून घ्या नव्या फोनची खासियत

youTube | आता यूट्यूबवर व्हिडीओ आणि कॅप्शन टाकताना यूजर्सना व्हावं लागणार नाही हैराण

गूगल प्ले स्टोरवरील ‘हे’ अ‍ॅप वापरत असाल तर सावधान ! अ‍ॅपमधून झाला यूजर्सचा डेटा लिक

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI