हुश्श! संपली बाबा एकदाची कटकट, अँड्रॉइडवरुन आयफोनवर होणार चॅट हिस्ट्री ट्रान्सफर

 तुम्ही अँड्रॉइड फोनवरून आयफोनवर शिफ्ट होणार असाल तर, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता अँड्रॉइडवरुन आयफोनवर तुम्ही तुमची चॅट हिस्ट्री, प्रोफाइलची माहिती, प्रोफाइल फोटो, वैयक्तिक चॅट्स, ग्रुप चॅट्स, मीडिया आणि सेटिंग्ज ट्रान्सफर करू शकणार आहात.

हुश्श! संपली बाबा एकदाची कटकट, अँड्रॉइडवरुन आयफोनवर होणार चॅट हिस्ट्री ट्रान्सफर
iPhone Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 6:14 PM

युजर्सच्या मागणीला अखेरीस यश आलेले दिसते. याचे कारण म्हणजे आता युजर्स अँड्रॉइड फोनवरुन त्यांची चॅट हिस्ट्रीसह प्रोफाइलची माहिती, फोटो आदी विविध डाटा आयफोनवर (iPhone) ट्रान्सफर करु शकरणार आहेत. त्यामुळे अँड्रॉइड फोनवरुन ज्यांना आता आयफोनवर शिफ्ट व्हायचे असेल त्यांना व्हाट्‌सअपच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. व्हॉट्सअॅपने (WhatsApp) अखेर अँड्रॉइडवरुन (Android) वरून आयफोनमध्ये चॅट हिस्ट्री ट्रान्सफर करण्यासाठी ॲक्सेस दिला आहे. पूर्वी ही सुविधा फक्त आयफोनवरुन अँड्रॉइडवर शक्य होती परंतु आता अँड्रॉइड टू आयफोन ट्रान्सफर होणार आहे. या नवीन फीचरमुळे मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा जास्त वापर करणार्या युजर्सना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, सध्या हे फीचर व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हेरिएंटवर आणले जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

  1.   व्हाट्‌सअपकडून मिळालेल्या माहितीनुसार, युजर्स आपली कॉल हिस्ट्री अँड्रॉइड फोनवरून आयफोनवर ट्रान्सफर करु शकणार आहेत.
  2.   व्हाट्‌सअपने त्याच्या FAQ पेजवर याबाबत सांगितले आहे, की जोपर्यंत युजर्स iCloud बॅकअप तयार करत नाही तोपर्यंत त्यांचा डेटा आपोआप क्लाउड स्टोरेजमध्ये ट्रान्सफर केला जाणार नाही.
  3. व्हॉट्सअॅपने आधीच सांगितले, की ते डिव्हाइसेसमध्ये ट्रान्सफर होणारा डेटा तपासू शकणार नाही.
  4. युजर्सच्या अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये चॅट डेटा असेल आणि तो तूम्हाला आयफोनवर ट्रान्सफर करायचा असल्यास युजर्सना त्यांचे मेसेजिंग अॅप डिलिट करावे लागणार आहे.
  5. हे सुद्धा वाचा
  6. या फीचर्सचा वापर करण्यासाठी युजर्सना नवीन डिव्हाइसवर जुनाच मोबाईल क्रमांक वापरावा लागणार आहे.
  7. दरम्यान, या फीचरचा लाभ घेण्यासाठी युजर्सचा आयफोन नवीन असणे आवश्यक आहे किंवा Move to iOS अॅपला जोडण्यासाठी जुन्या फोनवरून डेटा मूव्ह फॅक्टरी सेटिंग्जवर सेट करणे आवश्यक आहे.
  8. युजर्सचे दोन्ही डिव्‍हाइसेस वाय-फाय नेटवर्कशी कनेक्ट झालेली असणे आवश्यक राहिल. अशात काही समस्या असल्यास युजर्स अँड्रॉइड डिव्हाइस आयफोनच्या हॉटस्पॉटशी देखील कनेक्ट करू शकणार आहेत.
  9. चॅट हिस्ट्री ट्रान्सफर फीचरचा वापर करण्यासाठी युजर्सना त्यांच्या अँड्रॉइड फोनवर Move to iOS अॅप तयार करणे आवश्यक राहिल.
  10. हे नवीन फीचर केवळ 2.22.7.74 किंवा त्यापुढील व्हर्जनवर चालणाऱ्या अँड्रॉइड डिव्हाइसवर काम करेल.
  11. iOS युजर्ससाठी त्यांचा आयफोन 2.22.10.70 किंवा त्यावरील व्हर्जनचा असणे आवश्‍यक राहणार आहे.
Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....