‘या’ लोकप्रिय पिझ्झा कंपनीचा डेटा लीक, लाखो ग्राहकांचे पेमेंट डिटेल्स आणि क्रेडिट कार्डसह वैयक्तिक माहिती उघड, ऑनलाईन फसवणुकीची शक्यता

सुरक्षा तज्ज्ञांच्या (सिक्योरिटी एक्सपर्ट) मते, डॉर्क वेबवर 18 कोटी ऑर्डर्सचा डेटा उपलब्ध झाला आहे. (Dominos India users date leaked)

'या' लोकप्रिय पिझ्झा कंपनीचा डेटा लीक, लाखो ग्राहकांचे पेमेंट डिटेल्स आणि क्रेडिट कार्डसह वैयक्तिक माहिती उघड, ऑनलाईन फसवणुकीची शक्यता
Dominos India

मुंबई : प्रसिद्ध पिझ्झा ब्रँड Dominos चा डेटा पुन्हा एकदा लीक झाला आहे. सुरक्षा तज्ज्ञांच्या (सिक्योरिटी एक्सपर्ट) मते, डॉर्क वेबवर 18 कोटी ऑर्डर्सचा डेटा उपलब्ध झाला आहे. हॅकरने अहवाल सादर केला आहे, ज्यात 13TB Dominos डेटाचा अ‍ॅक्सेस मिळवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हॅकरकडे 180,00,000 ऑर्डर्सची माहिती आहे ज्यात युजर्सचे फोन नंबर, ईमेल, पत्ता, पेमेंट डिटेल्स आणि क्रेडिट कार्डची माहिती आहे. (Dominos India users date leaked, available on dark web)

सुरक्षा तज्ज्ञ राजशेखर राजारिया यांनी ट्विटरवर याबाबतचा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले आहे की, पुन्हा एकदा Dominos चा डेटा लीक झाला आहे. ते म्हणाले की, सर्च इंजिनवर 18 कोटी युजर्सचा डेटा उपलब्ध झाला आहे. यात Dominos वरुन नेहमी खरेदी करणाऱ्या युजर्सचा समावेश आहे. दरम्यान, प्रत्येकाचा वैयक्तिक डेटा लीक झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

एप्रिल महिन्याच्या सुरूवातीस, सायबर सिक्योरिटी फर्म हडसन रॉकच्या सीटीओ एलन गाल यांनी याबाबतचा खुलासा केला होता. त्यांनी सांगितले होते की, युजर्सची वैयक्तिक माहिती डार्क वेबवर विकली जात आहे आणि हॅकर्सनी येथे पोर्टलही तयार केले आहे. हॅकर्सकडून असा दावा करण्यात आला होता की, हॅकर्सकडे तब्बल 10 लाख क्रेडिट डिटेल्स आहेत. हा डेटा Domino’s Pizza ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांचा असल्याचे उघड झाले आहे.

आमच्या ग्राहकांचा डेटा सुरक्षित

Dominos इंडियाने असे म्हटले आहे की, आमच्याकडून कोणत्याही युजरचा डेटा लीक झाला नाही. Dominos ही Jubilant फुडवर्क्स अधिकृत जगभरातील एक प्रसिद्ध फुड सर्व्हिस कंपनी आहे. जगभरातील 285 शहरांमध्ये Dominos चे आउटलेट्स आहेत.

डार्क वेबवर डेटा विक्री

डेटा लीक्सची प्रकरणं सातत्याने समोर येत आहेत. बर्‍याच सोशल मीडिया कंपन्यांचा डेटा लीक झाला असून तो ऑनलाईन विकला जात आहे. हॅकर्स अशा प्रकारचा डेटा डार्क वेबवर विकतात आणि यातून कोट्यवधी रुपये वसूल करतात.

इतर बातम्या

सावधान! फेसबुकवर कोव्हिड-19 आणि लसीसंदर्भात अफवा पसरवणं महागात पडेल, कंपनी कठोर पावलं उचलणार

6000mAh बॅटरी, 48MP कॅमेरा, 6GB रॅमसह दमदार फोन बाजारात, किंमत 10,000 रुपयांहून कमी

Xiaomi, Realme ला टक्कर, OnePlus बजेट स्मार्टफोन लाँच करणार, जाणून घ्या फीचर्स

(Dominos India users date leaked, available on dark web)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI