Facebook, Insta,WhatsApp नंतर आता Gmail डाऊन, भारतात अनेकांना मेल पाठवण्यात अडचणी, नेमकं कारण काय?

अलीकडेच फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची सेवा बंद झाली होती. त्यानंतर आता जीमेल (Gmail) सेवा डाऊन झाली आहे. भारताच्या अनेक भागांमध्ये, लोक Google च्या या मोफत ईमेल सेवेमध्ये प्रवेश करताना अडचणींचा सामना करत आहेत.

Facebook, Insta,WhatsApp नंतर आता Gmail डाऊन, भारतात अनेकांना मेल पाठवण्यात अडचणी, नेमकं कारण काय?
Gmail

मुंबई : अलीकडेच फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपची सेवा बंद झाली होती. त्यानंतर आता जीमेल (Gmail) सेवा डाऊन झाली आहे. भारताच्या अनेक भागांमध्ये, लोक Google च्या या मोफत ईमेल सेवेमध्ये प्रवेश करताना अडचणींचा सामना करत आहेत. जीमेल वापरकर्ते ना मेल पाठवू शकत आहेत ना त्यांना कोणतेही मेल येत आहेत. (Gmail Down : google mail service suffers outage in India)

इंटरनेट सेवा बंद होण्याचे निरीक्षण करणारी साइट डाऊन डिटेक्टरच्या (Down Detector) मते, 68% लोकांनी नोंदवले आहे की, त्यांना वेबसाइटवर प्रवेश करण्यात समस्या येत आहे. 18% वापरकर्त्यांनी सर्व्हर कनेक्शनची तक्रार नोंदवली आहे तर 14% वापरकर्त्यांना लॉगइन करण्यात समस्या येत होत्या. यूकेमध्ये जीमेलची सेवा खूप धिम्या गतीने सुरु असल्याचे एका युजरने ट्विटरवर सांगितले आहे.

लोक ट्विटरवर याबद्दल माहिती देखील देत आहेत. नेटीझन्स #gmaildown हा हॅशटॅगसह ट्विट करत आहेत. कंपनीने अद्याप सेवा बंद होण्याचे कारण उघड केलेले नाही. दरम्यान, भारतातील अनेक भागांतील युजर्स Gmail बंद असल्याची तक्रार करत आहेत.

अगदी अलीकडे, सोशल मीडिया जायंट कंपनी फेसबुक देखील आऊटेजचा बळी ठरली होती. फेसबुकबरोबरच व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामही 6 तासांहून अधिक काळ बंद होते. गेल्या आठवड्यात असे दोनदा घडले होते, दोन वेळा या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची सेवा खंडित झाली होती.

नंतर, कंपनीने सांगितले की राउटर कॉन्फिगरेशनमध्ये बिघाड झाल्यामुळे आउटेजची समस्या निर्माण झाली होती. यामुळे फेसबुकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आता युजर्स जीमेल डाउन झाल्यानंतर याबाबत गुगलच्या अधिकृत स्टेटमेंटची वाट पाहात आहेत.

फेसबुक, इन्स्टा डाऊन, कंपनीची दिलगिरी

सोशल मीडिया अ‍ॅप्स इन्स्टाग्राम आणि फेसबुक एका आठवड्यात दोनदा डाऊन झाले होते. ही सेवा बंद झाल्यामुळे यूजर्सना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. शुक्रवारी (9 ऑक्टोबर) रात्री 12 नंतर सुमारे एक तास दोन्ही अ‍ॅप्सवर परिणाम झाला. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे फेसबुक आणि इन्स्टाग्राम काही काळ बंद होते. मात्र, नंतर ही सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. यापूर्वी रविवार-सोमवारी (3 ते 4 ऑक्टोबर दरम्यान) इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपचे सर्व्हरही सुमारे सहा तास बंद होते.

यासंदर्भात दोन्ही अ‍ॅप्सने एक निवेदन जारी केले होते. या निवेदनामध्ये ज्या युजर्सना या समस्येला सामोरे जावे लागले त्यांची माफी मागितली होती. फेसबुकने ट्विट केले की, “काही लोकांना अ‍ॅप्स आणि वेबसाइट्समध्ये प्रवेश करण्यात समस्या येत आहे त्यासाठी आम्ही दिलगीरी व्यक्त करत आहोत. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी तुम्ही आमच्यावर किती अवलंबून आहात हे आम्हाला माहिती आहे. आता आम्ही समस्या सोडवली आहे. यावेळीही तुम्ही संयम राखल्याबद्दल धन्यवाद.”

इतर बातम्या

एकाच आठवड्यात फेसबुक, इंस्टाग्राम दुसऱ्यांदा डाऊन, कंपनीकडून दिलगिरी

youTube | आता यूट्यूबवर व्हिडीओ आणि कॅप्शन टाकताना यूजर्सना व्हावं लागणार नाही हैराण

गूगल प्ले स्टोरवरील ‘हे’ अ‍ॅप वापरत असाल तर सावधान ! अ‍ॅपमधून झाला यूजर्सचा डेटा लिक

(Gmail Down : google mail service suffers outage in India)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI