व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी खूशखबर; 15 मेच्या डेडलाईननंतरही अकाऊंट डिलिट होणार नाही

ज्या युजर्सने कंपनीची पॉलिसी अजून मान्य केलेली नाही, त्यांच्यासाठी कंपनी येत्या काही आठवड्यांत नव्याने रिमाइंडर्स जारी करणार आहे. (Good news for WhatsApp users; The account will not be deleted even after the May 15 deadline)

व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी खूशखबर; 15 मेच्या डेडलाईननंतरही अकाऊंट डिलिट होणार नाही
व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी खूशखबर

नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅपच्या युजर्ससाठी मोठी बातमी समोर आली आहे. आता 15 मेच्या डेडलाईननंतरही कुणाचेही व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट डिलीट केले जाणार नाही. सोशल मीडिया चॅटिंग प्लॅटफॉर्मने हा मोठा निर्णय घेत आपल्या युजर्सना मोठी खूशखबर दिली आहे. कंपनीने आपल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की कंपनी 15 मे ची डेडलाईन पूर्णपणे हटवत आहे. या डेडलाईननंतरही कोणत्याही युजर्सचे अकाऊंट डिलिट केले जाणार नाही. याचाच अर्थ असा की जे युजर्स व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीचे पालन करणार नाहीत, त्या युजर्सचेसुद्धा अकाऊंट शाबूत राहणार आहे. कंपनी त्यांचे अकाऊंट जैसे थे ठेवणार आहे. ज्या युजर्सने कंपनीची पॉलिसी अजून मान्य केलेली नाही, त्यांच्यासाठी कंपनी येत्या काही आठवड्यांत नव्याने रिमाइंडर्स जारी करणार आहे. (Good news for WhatsApp users; The account will not be deleted even after the May 15 deadline)

प्रायव्हसी पॉलिसीमुळे इतर अॅपची लोकप्रियता वाढली

व्हॉट्सअ‍ॅपचा मालकी हक्क फेसबुककडे आहे. या कंपनी गेल्या वर्षी व्हॉट्सअ‍ॅपची नवीन प्रायव्हसी पॉलिसी सादर केली. या पॉलिसीला कडाडून विरोध झाला. कंपनीच्या या धोरणाचा निषेध म्हणून अनेकांनी व्हॉट्सअ‍ॅपची साथ सोडली आणि आपला मोर्चा दुसरीकडे वळवला. अनेक जण सिग्नल आणि टेलिग्राम यांसारख्या अ‍ॅपकडे वळले आहेत. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपची प्रायव्हसी पॉलिसी इतर अ‍ॅपच्या पथ्यावर पडली व त्या अ‍ॅपची लोकप्रियता अल्पावधीतच कमालीची वाढली. सिग्नल आणि टेलिग्राम अ‍ॅपच्या युजर्सची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

नवीन धोरणांमुळे युजर्सकडून तीव्र सामना

व्हॉट्सअ‍ॅपने ज्यावेळी आपल्या युजर्ससाठी प्रायव्हसी पॉलिसीची घोषणा केली होती, त्यावेळी युजर्सना प्रायव्हसी पॉलिसी स्विकारण्यासाठी 8 फेब्रुवारीपर्यंतची डेडलाईन देण्यात आली होती. जे युजर्स पॉलिसी अ‍ॅक्सेप्ट करणार नाहीत, त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट डिलीट केले जाईल, असेही फेसबुकमार्फत जाहीर करण्यात आले होते. अचानक बदललेल्या धोरणामुळे कंपनीला युजर्सकडून तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. अनेकजण स्वत:हून स्वत:च्या मोबाईलवरील व्हॉट्सअ‍ॅप डिलीट करू लागले. याचा मोठा धक्का बसल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या धोरणात थोडी नरमाई घेतली आणि डेडलाईन 15 मेपर्यंत वाढवली होती. त्यानंतर आता आणखी नरमाई घेत कंपनीने युजर्सना मोठा दिलासा दिला आहे. नव्या नियमानुसार कंपनी 15 मेच्या डेडलाईननंतरही कोणत्याही युजर्सचे अकाऊंट डिलीट करणार नाही. मात्र ज्या युजर्सनी प्रायव्हसी पॉलिसी अद्याप स्वीकारली नसेल त्या युजर्सना कंपनीकडून पुढील काही आठवड्यांसाठी अधूनमधून रिमाइंडर्स पाठवण्यात येणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅपची प्रायव्हसी पॉलिसी

व्हॉट्सअ‍ॅपने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आपली नवीन प्रायव्हसी पॉलिसी सादर केली होती. या पॉलिसीनुसार कंपनी युजर्सचे नाव, पत्ता, फोन नंबर, लोकेशन आणखी वैयक्तीक माहिती गोळा करते. ही व्यक्तीगत माहिती फेसबुक, इन्स्टाग्राम आणि मेसेंजरसोबत शेअर केली जाते, जेणेकरून युजर्सला त्यांच्या इंटरेस्टनुसार जाहिराती पाहता येऊ शकतात. या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅप आपल्या फायद्यासाठी युजर्सच्या व्यक्तीगत माहितीचा वापर करू लागल्याचा आरोप झाला व त्यातूनच कंपनीच्या पॉलिसीला वाढता विरोध होऊ लागला. (Good news for WhatsApp users; The account will not be deleted even after the May 15 deadline)

इतर बातम्या

शशिकांत शिंदे मराठा आहेत का? नरेंद्र पाटलांचा सवाल, शिंदेंचही चोख प्रत्युत्तर

Gold Rate Today: कोरोना संकटात सोने पुन्हा एकदा महागले, 10 ग्रॅम सोन्याचे भाव काय?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI