Google Pixel 9 ची भारतात निर्मिती,परंतू किंमत कमी होणार का ?
गुगल पिक्सेल 9 सिरीज, पिक्सेल वॉच 3 आणि पिक्सेल बड्स प्रो 2 यासह Google त्याच्या नेक्स्ट-इन-लाइन डिव्हाइसचे अनावरण आज रात्री होत आहे. Google इव्हेंटचे लाइव्ह स्ट्रीमिंग भारतात रात्री 10.30 पासून सुरू होणार आहे.
Apple च्या पाठोपाठ आता गुगलने देखील आता भारतात आपल्या स्मार्टफोन्सचे प्रोडक्टशन सुरु केले आहे. कंपनी आता भारतीय बाजारात पिक्सेल 9 चे प्रोडक्शन सुरु केले आहे. गेल्यावर्षी गुगल पिक्सेलने गुगल फॉर इंडिया इव्हेंटमध्ये याची घोषणा केली होती. आता कंपनीने आपल्या नव्या फोनचे प्रोडक्शन सुरु केले आहे. गुगल पिक्सेल कंपनी आता भारतीय बाजारात आणि ग्लोबल मार्केटमध्ये आपल्या नवीन पिक्सेल स्मार्टफोनला लॉंच करणार आहे.यावेळी कंपनी नवा फोल्डेबल फोन देखील लॉंच करणार आहे. गुगल कंपनी प्रथमच भारतीय बाजारात फोल्डींग फोन लॉंच करणार आहे.
Google Pixel चे फोन भारतात बनणार
गुगल आपला पहिला मेड इन इंडिया गुगल पिक्सेल 9 स्मार्टफोन रुपाने भारतात निर्मिती सुरु केली आहे. टेक्नॉलॉजी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या गुगलने या संदर्भात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार देखील मानले आहेत. याआधी गुगल पिक्सेल 9 चे प्रोडक्शन या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत सुरु होईल असा अंदाज होता. भारत सरकार देशांतर्ग प्रोडक्टशनसाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. याआधी दिग्गज एप्पल कंपनीने भारतात आपले प्रोडक्शन सुरु केले आहे. आता गुगल कंपनी आता आपला लेटेस्ट स्मार्टफोन देखील भारतात निर्माण करीत आहे.
भारतीय बाजारपेठेत मॅन्युफॅक्चरिंगद्वारे प्रवेश केल्याने गुगल कंपनीला येथील ग्राहकांना आकर्षित करायचे आहे. त्यामुळे गुगल कंपनी आपल्या फोन्सच्या किंमती कमी करणार की नाही याकडे साऱ्याचे लक्ष लागले आहे. गुगलने अद्याप आपल्या मॅन्युफॅक्चररची माहिती दिलेली नाही. अलिकडेच कंपनीने ऑफ लाईन मार्केटमध्ये प्रवेश करीत रिलायन्स डिजिटल स्टोअर आणि क्रोमा सोबत पार्टनरशिप केली आहे.
नवीन Pixel फोन होणार लॉंच
भारतात गुगलचे मॅन्युफॅक्चरिंग सुरु झाल्यानंतर मार्केटवर नेमका काय परिणाम होतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. कंपनी या फोन्सच्या किंमती कमी करणार की नाही याकडे लक्ष लागले आहे.गुगल पिक्सेल फोनची निर्मिती भारतात Dixon टेक्नॉलॉजी करणार असल्याचे कळत आहे. कंपनीने अजून याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.
महिन्याला एक लाख स्मार्टफोनची निर्मिती
भारतात दर महिन्याला एक लाख युनिट्स फोन्सची निर्मिती करण्याची कंपनीची योजना आहे. आज रात्री ( 13 ऑगस्ट ) ग्लोबल मार्केटमध्ये पिक्सेल 9 मालिकेतील फोन्स आणि फोल्डिंग फोनची लॉ़ंचिंग होणार आहे. त्यानंतर 14 ऑगस्ट रोजी हे फोन्स भारतीय बाजारात दाखल होतील असे म्हटले जात आहे.
