Google ची नवीन तयारी, स्मार्ट वॉचमधून मिळणार भूकंपाचे अलर्ट
भूकंप कधीही कुठेही येऊ शकतो. भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याचा धोका असतो. गूगल आता भूकंपाचा अलर्ट देणारे स्मार्टवॉच तयार करत आहे.

गूगलकडून विविध प्रकारचे गॅझेट तयार करण्याचे काम सातत्याने सुरु असते. गूगल भूकंपासाठी एक नवीन गॅझेट तयार करत आहे. भूकंपाचे अलर्ट देणारे स्मार्ट वॉच गूगलकडून तयार केले जात आहे. गूगलचे हे फीचर भूकंपाचे त्वरित अलर्ट देणार आहे. गूगलच्या या फीचरसंदर्भात मीडिया रिपोर्ट्समध्ये माहिती देण्यात आली आहे.
भूकंप कधीही कुठेही येऊ शकतो. भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याचा धोका असतो. गूगल लोकांच्या सुरक्षेसाठी काम करत आहे. गूगलने लोकांच्या सुरक्षेसाठी स्मार्ट वॉच बनवण्यासाठी तयारी सुरु केली आहे. गूगलकडे यापूर्वीच भूकंपासंदर्भात अलर्ट करणारी प्रणाली आहे. ही सिस्टम जगातील अनेक देशांकडे आहे. अनेक देशांनी ही सिस्टम मागेसुद्धा घेतली आहे. रिपोर्टनुसार भूकंपाचे अलर्ट देणारी प्रणाली Wear OS मध्ये येणार आहे. हे फीचरद्वारे एंड्रॉयड अथॉरिटी स्पॉट केले गेले आहे.
भारतात कधी येणार?
रिपोर्ट्सनुसार, गूगलचे हे फीचर युजरला केवळ भूकंपाची माहितीच देणार नाही तर भूकंपाचे केंद्र नेमके कुठे असणार आहे, त्याबद्दलही माहिती देणार आहे. गूगलचे हे फीचर भूकंपाची माहिती किती सेकंद आधी देईल याची माहिती शेअर करण्यात आलेली नाही. गूगलच्या या फीचरचा फायदा अनेकांना होऊ शकतो. स्मार्टवॉचवरील अलर्ट कसा असेल याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु हा अलर्ट स्मार्टफोनवरील भूकंपाच्या अलर्टसारखाच असू शकतो, अशी शक्यता आहे. हे फीचर भारतात कधी येईल, याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
प्रणाली कशी काम करणार
गूगलची प्रणाली विशेष भूकंपीय उपकरणांवर अवलंबून नाही, तर जगभरातील लाखो अँड्रॉइड फोनमध्ये आधीच तयार केलेले मोशन सेन्सर वापरते. जेव्हा एखाद्या क्षेत्रातील अनेक फोन एकाच वेळी कंपने जाणवतात, तेव्हा सेन्सर गती जाणवू शकतो. म्हणून गूगलचे सर्व्हर त्या डेटाचे विश्लेषण करतात आणि तो भूकंप आहे की नाही हे ठरवतात.