कन्फर्म! PUBG Mobile India लाँच होणार, हा घ्या पुरावा

पबजी इंडिया हा गेम कधी लाँच केला जाणार? असा सवाल गेल्या तीन महिन्यांपासून पबजीच्या चाहत्यांना सतावतोय. (PUBG Mobile India)

कन्फर्म! PUBG Mobile India लाँच होणार, हा घ्या पुरावा
PUBG-Mobile-
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 5:37 PM

मुंबई : भारत-चीन तणावाच्या (India-China tension) पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तीन महिन्यांपूर्वी चीनला मोठा झटका दिला. केंद्र सरकारने भारतात PUBG या लोकप्रिय गेमिंग अ‍ॅपसह 118 चिनी अ‍ॅप बॅन केले. त्यापूर्वी केंद्र सरकारने टिक टॉक, शेअरइट, हॅलो, यूसी ब्राऊझर यांसारखे एकूण 59 अ‍ॅप्लिकेशन बॅन केले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी PUBG Mobile गेम आता भारतात परतणार असल्याचे सांगण्यात आले होते. तेव्हापासून हा गेम नेमका कधी लाँच होणार याची पबजी गेमच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. तर काहीजण असंही म्हणत आहेत की पबजी गेम भारतात परतण्याच्या शक्यता आता मावळल्या आहेत. दरम्यान, पबजी मोबाईल इंडिया हा गेम लवकरच भारतात लाँच होणार असल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे. (here is proof that PUBG Mobile India going to launch soon)

भारतात PUBG Mobile लाँच होण्यासंबंधी अद्याप कोणतीही पक्की बातमी समोर आलेली नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की PUBG कॉर्पोरेशनने अद्याप आशा सोडलेली नाही. भारतात या गेमसाठीचं अप्रूव्हल मिळवण्यात अनेक अडचणी समोर येत आहेत. दुसऱ्या बाजूला पबजीने भारतात एका कंपनीची स्थापना तिथे लोकांना कामावर घेतलं जात आहे.

अलीकडेच, PUBG कॉर्पोरेशनने Investment & Strategy Analyst हायर करण्यासाठी लिंक्डइनवर जॉब व्हॅकेन्सी पोस्ट केली आहे. जॉब डिस्क्रिप्शन कंपनीने म्हटलं आहे की, उमेदवाराला भारत आणि MENA क्षेत्राशी संबंधित प्रक्रियेचे आणि जागतिक कराराच्या प्रवाहाचे मूल्यांकन करणे तसेच त्यांच्या ग्लोबल टीम्सना असिस्ट करणे यांसारखी कामं करावी लागतील.

नव्या गेममध्ये बदल केले जाणार

कंपनीने घोषणा केली आहे की, PUBG Mobile India नावाचा एक नवीन गेम लाँच केला जाणार आहे. यात काही बदल केले जातील जे पूर्णपणे इंडियन गेमर्ससाठी असतील. हा गेम व्हर्च्युअल सिम्युलेशन ट्रेनिंग गाऊंडमध्ये सेट केला जाईल आणि नवीन कॅरेक्टर्स क्लोथ अँड ग्रीन हिट इफेक्ट्स स्टार्ट करु शकतील. PUBG कॉर्पोरेशन भारतात आपली व्याप्ती वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. या नोकरीच्या ड्स्क्रीप्शनमधून याचा अंदाज लावता येईल. दरम्यान, असेही सांगण्यात आले आहे की, ही जॉब व्हॅकेन्सी कंपनीच्या बंगळुरु येथील कार्यालयासाठी आहे.

जबरदस्त गेमप्ले

दरम्यान, PUBG Corporation ने म्हटलं आहे की, आमचं नवं गेमिंग अॅप युजर्सना जास्तीत जास्त सुरक्षा आणि जबरदस्त गेम प्ले प्रदान करेल. भारतीय प्लेयर्सशी सहज कम्युनिकेशन व्हावे यासाठी कंपनी एक सबसिडरी तयार केली जाणार आहे. तसेच कंपनी भारतात 100 कर्मचाऱ्यांना नोकरी देणार आहे. यासाठी कंपनी भारतात काही ठिकाणी लोकल कार्यालय सुरु केली जाणार आहे. कंपनी भारतात लोकल बिझनेससह गेमिंग सर्व्हिस देणार आहे.

Krafton Inc (PUBG Corporation ची पॅरेंट कंपनी) या कंपनीने भारतात 100 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक मनोरंजन, लोकल गेम्स, ई-स्पोर्ट्स आणि आयटी इंडस्ट्रीसाठी असेल. PUBG Corporation च्या म्हणण्यानुसार ही कोणत्याही कोरियन कंपनीने भारतात केलेली सर्वात मोठी गुंतवणूक आहे.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतीय प्लेअर्सना अधिक चांगला अनुभव प्रदान करण्यासाठी PUBG कॉर्पोरेशनने त्यांचा गेमिंग कॉन्टेंट अपडेट आणि अधिक अॅडव्हान्स केला आहे. भारतीय प्लेअर्सच्या इच्छेनुसार आणि मागणीनुसार नवा गेम कस्टमाईज करण्यात आला आहे.

कसा बनला पबजी गेम?

एक जपानी चित्रपट ‘बॅटल रोयाल’ पासून प्रेरणा घेऊन Pubg हा गेम बनवण्यात आला आहे. या चित्रपटात सरकार विद्यार्थ्यांच्या एका ग्रूपला बळजबरी करून मृत्यूशी लढायला पाठवतं. त्याच गोष्टीला धरून हा गेम बनवण्यात आला आहे.

हा गेम दक्षिण कोरियाची व्हीडिओ गेम कंपनी ब्लूहोलनं विकसित केला आहे. या कंपनीनं या गेमचं डेस्कटॉप व्हर्जन तयार केलं होतं. परंतु, चीनची कंपनी Tenncent ने काही बदल करून या गेमचं मोबाईल व्हर्जन लाँच केलं. डेस्कटॉप व्हर्जनपेक्षा मोबाईल व्हर्जनला जगभरात खूप प्रसिद्धी मिळाली. भारतात हा गेम सर्वात यशस्वी ठरला. जगभरात पब्जी खेळणाऱ्यांपैकी जवळपास 25 टक्के लोक भारतातील आहेत, 17 टक्के चीनमध्ये तर 6% गेमर्स अमेरिकेत आहेत. जगभरात हा गेम 60 कोटींपेक्षा अधिक लोकांनी डाऊनलोड केला आहे.

संबंधित बातम्या

PUBG नंतर आता TikTok ही परतणार? युजर्समध्ये आनंदाचं वातावरण

ऑनलाईन अभ्यासासाठी मोबाईल दिला, पोराने PUBG गेममध्ये 16 लाख उडवले

PUBG गेम खेळू दिला नाही, मुलाने वडिलांच्या शरीराचे तीन तुकडे केले

PUBG ला आता FAU-G चा पर्याय, अक्षय कुमारकडून मोठी घोषणा

(here is proof that PUBG Mobile India going to launch soon)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.