दुसऱ्याच क्रमांकावर पाठवली रक्कम? असा मिळणार तुमचा पैसा परत

UPI Tips | अनेकदा घाई गडबडीत चुकून दुसऱ्याच्या बँका खात्यात रक्कम हस्तांतरीत होते. युपीआय मुळे व्यवहार अगदी सोपा झाला आहे. काही सेकंदात रक्कम हस्तांतरीत होते. अशावेळी अशी चूक होणे सहाजिक आहे. पण मग चुकून दुसऱ्याला पाठवलेली रक्कम परत कशी मिळवता येते? या काही ट्रिक्स आणि टिप्सने तुमची रक्कम परत मिळवता येते.

दुसऱ्याच क्रमांकावर पाठवली रक्कम? असा मिळणार तुमचा पैसा परत
Follow us
| Updated on: Dec 17, 2023 | 3:03 PM

नवी दिल्ली | 17 डिसेंबर 2023 : युपीआयमुळे व्यवहार करणे अत्यंत सोपे आणि जलद झाले आहे. तुम्ही अगदी सहज कोणत्याही मोबाईल क्रमांकावर सहज रक्कम हस्तांतरीत करु शकता. पण युपीआय व्यवहार करताना घाई गडबडीत दुसऱ्याच खात्यावर रक्कम हस्तांतरीत होते. व्यवहार झटपट होत असल्याने कधी कधी अशी चूक होते. मग रक्कम परत कशी मिळवायची असा प्रश्न सतावतो. ही रक्कम परत मिळेल की नाही, अशी पण चिंता लागते. कारण नंबर जर चुकला तर ती व्यक्ती आपल्या ओळखीची नसते. त्यामुळे ही रक्कम परत मिळेल की नाही? ही चिंता सतावते. अशावेळी ही टिप्स तुम्हाला उपयोगी पडू शकते. तुमची रक्कम परत मिळू शकते. ही रक्कम परत मिळण्याची पद्धत सोपी आहे.

असा दिला दिलासा

रबीआयने युपीआय पेमेंटविषयी एक जोरदार निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ग्राहकांना आता 1 लाखांहून थेट 5 लाख रुपयांपर्यंतचा व्यवहार युपीआयद्वारे करता येईल. पण ही सुविधा सर्रास सर्वच युपीआय व्यवहारांसाठी लागू नाही. काही व्यवहारांसाठीच ही सुविधा लागू करण्यात आली आहे. आरबीआयच्या या सुविधेचा लाभ केवळ हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्थांना मिळेल. या ठिकाणी युपीआय पेमेंटच्या माध्यमातून 5 लाख रुपयांपर्यंत व्यवहार करता येईल. त्यामुळे युपीआयचा वापर वाढेल असे आरबीआयने स्पष्ट केले. यामुळे अनेकांना आता शाळा, महाविद्यालयाचे शुल्क सोप्यारित्या युपीआयच्या माध्यमातून करता येईल.

हे सुद्धा वाचा

करा गुगलवर हे सर्च

  1. सर्वात अगोदर गुगलवर जाऊन NPCI असे सर्च करा. सर्चमध्ये राष्ट्रीय देयके महामंडळाची, National Payment Corporation Of India ची अधिकृत साईट उघडा. या साईटच्या डाव्या बाजूला थ्री डॉट दिसतील. तो मेन्यू बॉक्स आहे. त्यावर क्लिक करा.
  2. या थ्री डॉट मेन्यू आयकॉनवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या समोर काही पर्याय येतील. सर्वात खाली Get in Touch हा पर्याय निवडा. या पर्यायामध्ये तक्रारीसाठी एक पर्याय समोर येईल. UPI Complaint पर्यायावर क्लिक करा.
  3. UPI Complaint पर्याय निवडा. त्यानंतर तुम्हाला Transaction ऑप्शनवर जावे लागेल. या पर्यायवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला काही महत्वाचे प्रश्न विचारण्यात येतील. स्क्रीनवरील सर्व महत्वाच्या प्रश्नाची उत्तरे दिल्यानंतर सबमिट बटण दाबा.
  4. युपीआयवर तक्रार दाखल केल्यावर काही तासातच तुमची रक्कम तुमच्या खात्यात परत येईल. भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर संपर्क करुन तुम्ही चुकीच्या खात्यात पाठवलेली रक्कम परत मिळवता येईल.
Non Stop LIVE Update
जरांगेंकडून शिवीगाळ, लाड यांची पहिली प्रतिक्रिया, मी बोललो ते झोंबलं.
जरांगेंकडून शिवीगाळ, लाड यांची पहिली प्रतिक्रिया, मी बोललो ते झोंबलं..
... तर फडणवीसांसोबत लग्न कर...भाजप नेत्यावर टीका जरांगेंची जीभ घसरली
... तर फडणवीसांसोबत लग्न कर...भाजप नेत्यावर टीका जरांगेंची जीभ घसरली.
सिंधुदुर्गात तुफान पावसानं झोडपलं, वेंगुर्ल्यातील पूल पाण्याखाली अन्..
सिंधुदुर्गात तुफान पावसानं झोडपलं, वेंगुर्ल्यातील पूल पाण्याखाली अन्...
... तोपर्यंत दार उघडणार नाही, शेतकरी प्रश्नांसाठी नितीन देशमुख आक्रमक
... तोपर्यंत दार उघडणार नाही, शेतकरी प्रश्नांसाठी नितीन देशमुख आक्रमक.
वडेट्टीवारांच्या बंगल्याला गळती; म्हणाले, लाडकी बहीण, भाऊ अन् मामा...
वडेट्टीवारांच्या बंगल्याला गळती; म्हणाले, लाडकी बहीण, भाऊ अन् मामा....
ठाकरे गट 'इतक्या' जागा लढणार? 36 पैकी ‘या’ 25 मतदारसंघासाठी आग्रही
ठाकरे गट 'इतक्या' जागा लढणार? 36 पैकी ‘या’ 25 मतदारसंघासाठी आग्रही.
मुलाला आत्महत्येपूर्वी व्हिडीओ कॉल अन्...सी-लिंकवरून त्यानं घेतली उडी
मुलाला आत्महत्येपूर्वी व्हिडीओ कॉल अन्...सी-लिंकवरून त्यानं घेतली उडी.
राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल, शिंदेंच्या बहिणीचं, सुनेचं घर...
राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल, शिंदेंच्या बहिणीचं, सुनेचं घर....
लोकलमधून उतरताच प्लॅटफॉर्मवरून प्रवाशी धावत सुटले... अंधेरी स्थानकात..
लोकलमधून उतरताच प्लॅटफॉर्मवरून प्रवाशी धावत सुटले... अंधेरी स्थानकात...
राज्यात पुन्हा पावसाची बॅटिंग, आज कुठे कसा पडणार पाऊस? बघा IMDचा अंदाज
राज्यात पुन्हा पावसाची बॅटिंग, आज कुठे कसा पडणार पाऊस? बघा IMDचा अंदाज.