AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरबसल्या ऑनलाईन जातीचा दाखला बनवणाची ‘ही’ सोपी पद्धत जाणून घ्या आणि वेळ वाचवा!

जातीचा दाखला काढायचा म्हणजे सरकारी ऑफिसच्या चकरा, लांब रांगा आणि वेळेचा अपव्यय... हा त्रास तुम्हालाही आठवत असेल! पण तुम्हाला माहितीय का, की हे महत्त्वाचं काम आता तुम्ही एका क्लिकवर, घरबसल्या करू शकता?

घरबसल्या ऑनलाईन जातीचा दाखला बनवणाची ‘ही’ सोपी पद्धत जाणून घ्या आणि वेळ वाचवा!
Caste Certificate
| Edited By: | Updated on: May 07, 2025 | 3:15 PM
Share

सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असो, ‘जातीचा दाखला’ हे एक अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र आहे. पूर्वी हा दाखला काढायचा म्हणजे सरकारी कार्यालयात जाऊन अर्ज भरणं, रांगेत उभं राहणं अशा अनेक किचकट पायऱ्या होत्या. यात वेळही खूप जायचा आणि त्रासही व्हायचा. पण आता ‘Digital India’ मुळे हे काम खूप सोपं झालं आहे! तुम्ही सरकारी ऑफिसमध्ये न जाता, घरबसल्या तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलवरून जातीच्या दाखल्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

महाराष्ट्रासाठी ऑनलाइन अर्ज कुठे करायचा?

महाराष्ट्र सरकारने नागरिकांसाठी अनेक सरकारी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. जातीचा दाखला ऑनलाईन काढण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या ‘आपले सरकार’ (https://aaplesarkar.mahaonline.gov.in/) या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी लागेल.

ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया:

जर तुम्ही ‘आपले सरकार’ पोर्टल पहिल्यांदाच वापरत असाल, तर तुम्हाला आधी तुमची नोंदणी करावी लागेल.

पोर्टलच्या होमपेजवर ‘New User? Register Here’ यावर क्लिक करा.

तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल आणि मोबाईल नंबर टाकून OTP द्वारे Verification करावे लागेल.

त्यानंतर एक Username आणि Password तयार करा. तुमची माहिती भरून नोंदणी पूर्ण करा.

तुमची नोंदणी यशस्वी झाल्यावर, तयार केलेल्या यूजरनेम आणि पासवर्डने पोर्टलवर लॉगिन करा.

लॉगिन केल्यावर तुम्हाला विविध विभागांच्या सेवा दिसतील. तुम्हाला ‘महसूल विभाग’ (Revenue Department) मध्ये जाऊन ‘जातीचा दाखला’ (Caste Certificate) मिळवण्यासाठीचा पर्याय शोधावा लागेल.

‘जातीचा दाखला’ या सेवेवर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर ऑनलाईन अर्ज उघडेल.

तुमची वैयक्तिक माहिती, पत्ता, जातीबद्दलची माहिती इत्यादी सर्व तपशील काळजीपूर्वक आणि अचूकपणे भरा.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रं Scan करून अपलोड करावी लागतील.

अर्जासोबत लागणारे शासकीय शुल्क तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल.

सर्व माहिती भरून आणि कागदपत्रं अपलोड करून झाल्यावर, अर्ज एकदा तपासून घ्या आणि ‘सबमिट’ करा. तुम्हाला एक Application ID मिळेल, जो पुढील संदर्भासाठी महत्त्वाचा आहे.

दाखला कसा मिळेल?

तुमचा अर्ज आणि कागदपत्रं अधिकाऱ्यांकडून तपासली जातील. सगळं बरोबर असल्यास, तुमचा जातीचा दाखला तयार होईल आणि तो तुम्ही याच ‘आपले सरकार’ पोर्टलवरून डाउनलोड करू शकाल. तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर किंवा ईमेलवर याबाबत सूचनाही मिळेल.

Follow Us
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका.
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च.
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात.
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह.
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र.
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका.
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा.