OnePlus 13s लवकरच भारतात लाँच, पॉवरफूल प्रोसेसरसह सॅमसंगला देईल टक्कर
OnePlus ब्रँडचा हा नवीन स्मार्टफोन लवकरच तुमच्यासाठी लाँच होणार आहे, कंपनीने सोशल मीडियावर या फोनचा टीझर देखील जारी करण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय, वनप्लस आणि अमेझॉनच्या अधिकृत साइटवर या फोनसाठी एक नवीन पेज तयार करण्यात आले आहे, या फोनमध्ये कोणते फीचर्स उपलब्ध असणार आहेत ते आपण जाणून घेऊयात...

OnePlus ब्रँडच्या आगामी स्मार्टफोन OnePlus 13s बद्दल बऱ्याच दिवसांपासून भारतीय बाजारपेठेत बरीच चर्चा सुरू आहे आणि आता कंपनीने त्यांच्या अधिकृत साइटवर या फोनबद्दल माहिती देणारे एक वेगळे पेज तयार केले आहे. हा फोन गेल्या आठवड्यात चीनी बाजारात OnePlus 13T या नावाने लाँच करण्यात आला होता, लाँच होण्यापूर्वीच हा फोन ब्लॅक वेल्वेट आणि पिंक सॅटिन या दोन रंगांमध्ये लाँच केला जाईल असे कंपनीद्वारे सांगण्यात आले होते. एवढेच नाही तर कंपनीने फोनमध्ये उपलब्ध असलेल्या काही खास फीचर्सचीही पुष्टी केली आहे.
हा फोन भारतीय बाजारात मेटल फ्रेमसह लाँच केला जाऊ शकतो, इतकेच नाही तर अलर्ट स्लायडरऐवजी, हा फोन कस्टमाइझ करण्यायोग्य बटणासह लाँच केला जाऊ शकतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, वनप्लस ब्रँडच्या या आगामी फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर असेल. OnePlus 13S मध्ये 6.32-इंच स्क्रीन आहे जी त्याला एक कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन बनवते. वनप्लसची अधिकृत साइट उघडताच, तुम्हाला वरच्या बाजूला Notify Me हा पर्याय लिहिलेला दिसेल.
दरवर्षीप्रमाणे, वनप्लस कंपनीचा हा फोन अधिकृत लाँचिंगनंतर कंपनीच्या अधिकृत साइट व्यतिरिक्त ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. ऑनलाइन ऐवजी तुम्हाला हा फोन ऑफलाइन स्टोअरमध्ये देखील उपलब्ध करून दिला जाईल.
OnePlus 13s लाँच तारीख: तो कधी लाँच होईल?
सध्या भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी OnePlus 13S कधी लाँच होईल हे माहित नाही. पण ही माहिती लवकरच कंपनी कडून जाहिर केली जाऊ शकते.
OnePlus 13T ची संभाव्य फिचर्स
120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 1.5 k रिझोल्यूशन सपोर्ट असलेल्या या फोनमध्ये 16-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आणि 50-मेगापिक्सेल प्रायमरी आणि 50-मेगापिक्सेल टेलिफोटो कॅमेरा सेन्सर असू शकतो. या फोनला चार्ज ठेवण्यासाठी यामध्ये पॉवरफूल अशी 6260mAh बॅटरी दिली जाऊ शकते, जी 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. तसेच हा फोन 16 जीबी रॅम आणि 1 टीबी पर्यंतच्या अंतर्गत स्टोरेजसह लाँच केला जाऊ शकतो.
OnePlus 13s ची संभाव्य किंमत
चीनमध्ये OnePlus 13T या नावाने लाँच झालेल्या या फोनची सुरुवातीची किंमत 3399 चिनी युआन म्हणजेच आपल्या भारतीय चलनानुसार 39,650 रुपये इतकी किंमत आहे आणि या फोनचे टॉप मॉडेल 3999 चिनी युआन म्हणजेच आपल्या भारतीय चलनानुसार सुमारे 46,649 रुपये आहे. जर हा फोन भारतात या किंमतीच्या श्रेणीत लाँच झाला, तर हा फोन SAMSUNG Galaxy S24 FE 5G या फोनची किंमत 41,999 रूपये आणि Xiaomi 14 CIVI ची किंमत 44,999 रूपये असलेल्या यांसारख्या स्मार्टफोनशी स्पर्धा करेल.
