AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OnePlus चा ढासू Smart TV बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड वनप्लस (OnePlus) पुढील आठवड्यात आपल्या Y-सिरीज लाइन अप अंतर्गत नवीन स्मार्ट टीव्ही बाजारात सादर करणार आहे.

OnePlus चा ढासू Smart TV बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास
Oneplus Smart Tv
| Updated on: May 22, 2021 | 5:52 PM
Share

मुंबई : कंज्युमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड वनप्लस (OnePlus) पुढील आठवड्यात आपल्या नव्या टीव्ही लाइनअपची सुरुवात करणार आहे. कंपनीने म्हटले आहे की, ते आपल्या Y-सिरीज लाइन अप अंतर्गत नवीन स्मार्ट टीव्ही बाजारात सादर करणार आहेत. हा स्मार्ट टीव्ही 24 मे रोजी लाँच केला जाईल. (OnePlus is going to launch Smart TV in India, check price and features; OnePlus TV 40Y1)

कंपनीने आपल्या संकेतस्थळावर खुलासा केला आहे की, हे डिव्हाइस वनप्लस टीव्ही 40 वाय 1 (OnePlus TV 40Y1) म्हणून लाँच केलं जाईल. या टीव्हीची स्क्रीन साईज 40 इंच इतकी असेल. यासह या स्मार्ट टीव्हीचे काही फीचर्स वेबसाइटवर सादर करण्यात आले आहेत. हा टीव्ही 64 बिट प्रोसेसरद्वारे सपोर्टेड आहे आणि Android TV 9-बेस्ड ऑक्सिजनप्लेवर चालतो.

जबरदस्त फीचर्स

40 इंचांची स्क्रीन असलेला हा टीव्ही फुल एचडी डिस्प्ले रेझोल्यूशनसह सादर करण्यात आला आहे आणि त्यात 93 टक्के DCI-P3 गमेट कव्हरेज आहे आणि गॅमा इंजिन पिक्चर एन्हेंसर देण्यात आला आहे. याशिवाय यामध्ये बिल्ट-इन क्रोमकास्टसह अलेक्सा आणि गुगल असिस्टंटची सुविधाही ग्राहकांना मिळणार आहे.

OnePlus TV40Y1 स्मार्ट टीव्हीमध्ये दोन 20W स्पीकर्स आहेत जे डॉल्बी ऑडिओ सपोर्टसह येतात. या स्मार्ट टीव्हीमध्ये इथरनेट पोर्ट, आरएफ कनेक्शन इनपुट, दोन एचडीएमआय पोर्ट, एक एव्ही इन, एक डिजिटल ऑडिओ आउटपुट आणि दोन यूएसबी पोर्ट देण्यात आले आहेत.

ऑनलाईन-ऑफलाईन विक्रीसाठी उपलब्ध होणार

वनप्लसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या स्मार्ट टीव्हीबद्दल ट्विट केले आहे. कंपनीने त्यात OnePlus TV40Y1 स्मार्ट टीव्हीचा फोटो शेअर केला आहे आणि म्हटले आहे की, हा टीव्ही वनप्लस ऑफलाइन स्टोअरमध्ये आणि OnePlus.in आणि Flipkart.com वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Y सिरीज अंतर्गत स्वस्त टीव्ही उपलब्ध

OnePlus च्या Y सिरीजमधील अँड्रॉइड टीव्ही हे परवडणाऱ्या श्रेणीतील टीव्ही म्हणून ओळखले जातात. कंपनी सध्या या सिरीजमध्ये दोन टीव्ही विकत आहे. या दोन्ही टीव्हींची नावं OnePlus TV 32Y1 आणि OnePlus TV 43Y1 अशी आहेत, ज्यांच्या किंमती अनुक्रमे 15,999 आणि 26,999 रुपये इतक्या आहेत.

इतर बातम्या

सावधान! फेसबुकवर कोव्हिड-19 आणि लसीसंदर्भात अफवा पसरवणं महागात पडेल, कंपनी कठोर पावलं उचलणार

6000mAh बॅटरी, 48MP कॅमेरा, 6GB रॅमसह दमदार फोन बाजारात, किंमत 10,000 रुपयांहून कमी

Xiaomi, Realme ला टक्कर, OnePlus बजेट स्मार्टफोन लाँच करणार, जाणून घ्या फीचर्स

(OnePlus is going to launch Smart TV in India, check price and features; OnePlus TV 40Y1)

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.