Samsung चा ‘हा’ नवीन फोन भारतात झाला लाँच, किंमत 20 हजारांपेक्षा कमी
सॅमसंग कंपनीने त्यांचा नवीन फोन भारतीय बाजारापेठेत लाँच करण्यात आलेला आहे. अशातच हा स्मार्टफोन तुम्ही 20 हजारापेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण सॅमसंगच्या या नवीन फोनचे फिचर्स जाणून घेऊयात...

स्मार्टफोन प्रेमींसाठी आणखीन एक आनंदाची बातमी म्हणजे दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगने भारतात त्यांचा नवीन एफ-सीरीज फोन, Galaxy F36 5G लाँच केला आहे. या फोनची किंमत 20,000 पेक्षा कमी आहे आणि हा नवीन स्मार्टफोन Exynos 1380 चिपसेटने सुसज्ज आहे. यात 50-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरासह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि मागील बाजूस लेदर फिनिश बॅक पॅनल आहे. हा फोन तीन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे. यासोबतच गुगलच्या सर्कल टू सर्च आणि जेमिनी लाईव्ह सारखे अनेक एआय फीचर्स देखील यात देण्यात आले आहेत. चला तर मग आजच्या लेखात आपण या स्मार्टफोनची किंमत आणि फिचर्सबद्दल तसेच तुम्ही हा फोन कोणत्या प्लॅटफॉर्मवरून खरेदी करू शकता. हे सविस्तर जाणून घेऊयात…
Samsung Galaxy F36 5G किंमत आणि उपलब्धता
भारतात लाँच झालेल्या सॅमसंग गॅलेक्सी F36 5G च्या 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 17,499 रुपये आहे. तसेच 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंट असलेला फोन तुम्ही 18,999 रुपयांना खरेदी करू शकता.
हा नवीन F-सीरीज स्मार्टफोन 29 जुलै दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्ट आणि सॅमसंगच्या अधिकृत ऑनलाइन स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. हा फोन कोरल रेड, लक्स व्हायलेट आणि ओनिक्स ब्लॅक या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. सर्व प्रकारांमध्ये लेदर फिनिश रिअर पॅनल आहे, जे स्मार्टफोनला प्रीमियम लूक देते.
Samsung Galaxy F36 5G चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy F36 5G हा ड्युअल-सिम फोन आहे ज्यामध्ये 6.7-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले फुल-एचडी+ रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस+ प्रोटेक्शनसह येतो. डिस्प्लेमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी वॉटरड्रॉप नॉच आहे.
फोनमध्ये ऑक्टा-कोर Exynos1380 प्रोसेसर आहे, जो Mali-G68 MP5 GPU सह जोडलेला आहे. थर्मल मॅनेजमेंटसाठी त्यात व्हेपर चेंबर देखील आहे. फोनमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज आहे, जे मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी, Galaxy F36 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्राथमिक 50-मेगापिक्सेल f/1.8 सेन्सर आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) आणि 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. याशिवाय, f/2.2 अपर्चरसह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी, फोनमध्ये 13-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे, जो 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला देखील सपोर्ट करतो.
हा फोन Android 15 वर आधारित One UI 7 वर चालतो. सॅमसंगने 6 जनरेशनचे Android OS अपडेट्स आणि 7 वर्षांचे सुरक्षा पॅचेस देण्याचे आश्वासन दिले आहे. यात गुगल सर्कल टू सर्च, जेमिनी लाईव्ह, ऑब्जेक्ट इरेजर, इमेज क्लिपर आणि एआय एडिट सजेशन्स सारखे एआय फीचर्स देखील आहेत.
Galaxy F36 5G मध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि USB टाइप-सी पोर्ट आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.3 आणि GPS + GLONASS सपोर्ट आहे. फोनचा आकार 164.4×77.9×7.7mm आहे आणि या फोनचा वजन 197 ग्रॅम आहे.
