अवघ्या 8 मिनिटात फोन पूर्ण चार्ज होणार, Xiaomi ने सादर केला HyperCharge फास्ट चार्जिंग सपोर्ट

फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारे बरेच स्मार्टफोन बाजारात दाखल होत आहेत. टेक कंपन्या या तंत्रज्ञानाशी संबंधित नवनवे गॅझेट्स सादर करत असतात.

अवघ्या 8 मिनिटात फोन पूर्ण चार्ज होणार, Xiaomi ने सादर केला HyperCharge फास्ट चार्जिंग सपोर्ट
Xiaomi Hypercharge
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 7:32 PM

मुंबई : फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारे बरेच स्मार्टफोन बाजारात दाखल होत आहेत. टेक कंपन्या या तंत्रज्ञानाशी संबंधित नवनवे गॅझेट्स सादर करत असतात. दरम्यान, शाओमी कंपनीने 200W हायपरचार्ज (Xiaomi HyperCharge) फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान सादर केले आहे, जे 8 मिनिटांपेक्षा कमी वेळेत 4,000mAh क्षमतेची बॅटरी पूर्णपणे चार्ज करु शकते, असा दावा कंपनीने केला आहे. (Smartphone will charged in 8 minutes only, Xiaomi HyperCharge fast charging support Presented)

याव्यतिरिक्त, कंपनीने 120W वायरलेस फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान सादर केले आहे जे 15 मिनिटांत 4,000 एमएएच बॅटरी क्षमता असलेला स्मार्टफोन पूर्णपणे चार्ज करण्याचा दावा करते. 200W हायपरचार्ज फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह कंपनीने गेल्या वर्षी Mi 10 Ultra आणि 80W वायरलेस फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह 120W फास्ट चार्जिंग सिस्टिम सादर करण्यात आली होती. यामुळे Xiaomi कंपनी 200W फास्ट चार्जिंग सादर करणारी पहिली ओईएम बनते. 200W फास्ट चार्जिंग सिस्टिम स्मार्टफोनसाठी सर्वाधिक आहे.

चिनी टेक जायंटने ट्विटरवर 200W हायपरचार्ज फास्ट चार्जिंग आणि 120 डब्ल्यू वायरलेस फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीची घोषणा केली. शाओमीने एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये 4,000 एमएएच बॅटरीसह स्मार्टफोन नवीन वायर्ड आणि वायरलेस तंत्रज्ञानासह किती वेगवान आहे, याबद्दल माहिती दिली आहे. व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की, 4000 एमएएच बॅटरी असलेला स्मार्टफोन 10 टक्के चार्ज होण्यासाठी केवळ 44 सेकंद लागतात, 50 टक्के चार्ज होण्यासाठी केवळ 3 मिनिटे लागतात, तर वायर्ड फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह फोन 8 मिनिटांपेक्षा कमी वेळात पूर्णपणे चार्ज केला जातो.

Xiaomi च्या फोनचा जगभरात धुमाकूळ

चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने (Xiaomi) एक नवीन विक्रम नोंदवला आहे. या कंपनीचा एक स्मार्टफोन जगभरात सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन ठरला आहे. काउंटरपॉईंट रिसर्च ग्लोबल हँडसेट मॉडेल ट्रॅकरच्या मते, शाओमीचा रेडमी 9 ए (Redmi 9A) स्मार्टफोन 2021 च्या पहिल्या तिमाहीत सर्वाधिक विक्री होणारा स्मार्टफोन ठरला आहे.

हा स्मार्टफोन व्हॉल्यूमच्या बाबतीत अव्वल स्थानी राहिला आहे, तर सॅमसंग गॅलेक्सी एस 21 अल्ट्रा 5 जी (Galaxy S21 Ultra 5G) या स्मार्टफोनने कमाईच्या बाबतीत विक्रम नोंदविला आहे आणि अव्वल स्थानावर आहे. शाओमी रेडमी 9 ए स्मार्टफोन गेल्या वर्षी ‘देश का स्मार्टफोन’ या टॅगलाइनअंतर्गत भारतात सादर करण्यात आला होता.

Redmi 9A स्मार्टफोनची सर्वाधिक विक्री चीन आणि भारतात झाली तर Redmi 9 ने दक्षिण आशियाई बाजारात चांगली कामगिरी केली आहे. काउंटरपॉईंट रिसर्चमध्ये असे म्हटले आहे की, Redmi 9, Redmi 9A आणि Redmi Note 9 च्या जबरदस्त विक्रीमुळे शाओमी कंपनी ग्लोबली $150 च्या प्राइस बँडमध्ये अव्वल ठरली आहे आणि कंपनीने या सेगमेंटमध्ये 19 टक्के वाटा मिळविला आहे.

इतर बातम्या

15 हजार रुपयांहून कमी किंमतीत 5G स्मार्टफोन, जाणून घ्या टॉप 5 स्मार्टफोन्सचे फीचर्स

6000mAh बॅटरी, 48MP कॅमेरा, 6GB रॅमसह दमदार फोन बाजारात, किंमत 10,000 रुपयांहून कमी

48MP ट्रिपल कॅमेरा, 5000mAh बॅटरी, Realme चा नवा स्मार्टफोन लाँच, किंमत…

(Smartphone will charged in 8 minutes only, Xiaomi HyperCharge fast charging support Presented)

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.