दमदार फिचर्स असलेला iQOO Z11 Lite स्मार्टफोन भारतात 20 हजारांपेक्षा कमी किमतीत होणार लाँच
iQOO चा हा नवीन मिड-रेंज फोन पुढील आठवड्यात भारतात लाँच होणार आहे. लाँचपुर्वी किंमतीवरून अशी माहिती समोर आली आहे की कंपनी हा फोन 20 हजारापेक्षा कमी सुरुवातीच्या किंमतीत ललाँच करू शकते. चला तर मग या फोनची लाँच डेट आणि फिचर्स जाणून घेऊया.

तुम्हाला जर नवीन स्मार्टफोन तेही उत्तम फिचर्स असलेला खरेदी करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण भारतात रोज अनेक स्मार्टफोन कंपन्या त्यांचे नवीन फोन लाँच करत असतात. अशातच iQOO Z11 Lite पुढील आठवड्यात भारतात लाँच होणार आहे. लाँचच्या आधी कंपनीने या नवीन फोनबद्दल सोशल मिडियावर टीझर्स शेअर करण्यास सुरुवात केली आहे. या आगामी स्मार्टफोनची किंमत रेंज आता जाहीर झाली असून, हा एक मिड-रेंज फोन असेल हे टीझर्स वरून निश्चित झाले आहे. या iQOO फोनसाठी एक समर्पित मायक्रोसाइट देखील तयार करण्यात आली आहे, ज्यावर त्याची बॅटरी, चार्जिंग सपोर्ट, कॅमेरा आणि डिस्प्ले वैशिष्ट्यांविषयी माहिती उघड झाली आहे. iQOO Z11 Lite मध्ये वेग आणि मल्टीटास्किंगसाठी मीडियाटेक डायमेन्सिटी 6000 ऑक्टा-कोर चिपसेट वापरण्यात आला आहे. iQOO Z11 Lite पुढील आठवड्यात 24 जुलै रोजी भारतीय बाजारपेठेत लाँच होईल.
iQOO Z11 Lite ची भारतातील किंमत
गॅजेट्स 360 च्या वृत्तानुसार iQOO स्मार्टफोन 20 हजार रूपयांपेक्षा कमी सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला जाईल. कंपनी याला एक व्हॅल्यू-फोकस्ड स्मार्टफोन म्हणून सादर करेल, ज्याचा मुख्य ग्राहक वर्ग विद्यार्थी असेल. शिवाय फोनच्या मायक्रोसाइटवरून हे निश्चित झाले आहे की, यात 6500mAh क्षमतेची बॅटरी असेल, जी एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 20 तासांपर्यंत सोशल मीडिया स्क्रोलिंग किंवा 80 तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक देऊ शकते असा दावा करण्यात आला आहे.
याव्यतिरिक्त, फोनमध्ये 44W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल. कंपनीचा दावा आहे की 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 8 तास कॉलिंग किंवा 7.2 तास ऑनलाइन व्हिडिओ प्लेबॅक मिळेल. 5 वर्षांच्या वापरानंतरही बॅटरी तिची मूळ क्षमता 80% पर्यंत टिकवून ठेवते असा दावा केला जातोय. फोनमध्ये वायर्ड रिव्हर्स चार्जिंग आणि बायपास चार्जिंग 2.0 चे सपोर्ट देखील असेल. टिकाऊपणासाठी यात MID-STD-810H मिलिटरी-ग्रेड सर्टिफिकेशन देखील असेल. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास हा फोन 50-मेगापिक्सलच्या ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह लाँच केला जाईल.
