2025 अखेरीस टिम कुक अ‍ॅपलचं सीईओपद सोडण्याची शक्यता, जाणून घ्या सर्वकाही

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 30, 2021 | 5:00 PM

टिम कुक गेली 10 वर्षे Apple कंपनीसोबत आहेत आणि प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीची काळजी घेत आहेत. कुक यांनी आपल्या कार्यकाळात आतापर्यंत अनेक उत्पादने लाँच केली आहेत, ज्यामुळे कंपनीने आतापर्यंत एकूण कमाई 81.4 बिलियनने वाढवली आहे.

2025 अखेरीस टिम कुक अ‍ॅपलचं सीईओपद सोडण्याची शक्यता, जाणून घ्या सर्वकाही
Tim Cook

मुंबई : Apple कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून जगातील आघाडीच्या टेक्नोलॉजी कंपन्यांच्या यादीत अग्रस्थानी आहे. कंपनीने हे नाव त्यांच्या उत्पादनांमुळे मिळवले आहे आणि नेहमीच टॉपला राहिले आहे. या सगळ्यामागे कंपनीचे प्रमुख म्हणजेच टिम कुक यांचा हात आहे. टिम कुक गेली 10 वर्षे या कंपनीसोबत आहेत आणि प्रत्येक छोट्या – मोठ्या गोष्टीची काळजी घेत आहेत. कुक यांनी आपल्या कार्यकाळात आतापर्यंत अनेक Apple उत्पादने लाँच केली आहेत, ज्यामुळे कंपनीने आतापर्यंत एकूण कमाई 81.4 बिलियनने वाढवली आहे. (Tim Cook probably leaving Apple in 2025)

मात्र, कुक यांच्या नेतृत्वाखालील Apple चे सुवर्णयुग आता संपण्याच्या मार्गावर आहे. कुक यांनी अलीकडेच संकेत दिले आहेत की, ते पुढील 10 वर्षे अॅपलसोबत राहणार नाहीत. अशा परिस्थितीत, अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आपला उर्वरित कार्यकाळ कसा पार पाडतील हे एका नवीन अहवालातून समोर आले आहे. ब्लूमबर्ग मार्क गार्मन यांनी म्हटले आहे की, सीईओ पद सोडण्यापूर्वी कुक मुख्य उत्पादन श्रेणीवर काम करतील.

Apple ची इलेक्ट्रिक कार येणार?

गार्मन पुढे म्हणाले की, हे उत्पादन काय असेल आणि कुक यांनी आतापर्यंत याबद्दल काय म्हटले आहे, त्याबद्दल सध्या माहिती नाही. Apple ला आतापर्यंत अनेक प्रोडक्ट्सशी लिंक केले गेले आहे जे भविष्यात येऊ शकतात. यामध्ये संशोधन आणि विकासाचा समावेश आहे, ज्यात इलेक्ट्रिक कारचे नाव सर्वात वर येते. परंतु हे उत्पादन लाँच होण्यास बराच वेळ लागू शकतो.

नव्या उत्पादनांसाठी कुक यांचे परिश्रम

अशा परिस्थितीत कुक यांचे लक्ष केवळ अॅपल पोर्टफोलिओ वाढवण्यावर असेल. म्हणजेच, कंपनी जी उत्पादने अल्पावधीत लॉन्च करू शकते. गार्मन पुढे म्हणाले की, कुक येथे अॅपलच्या ऑगमेंटेड रिअॅलिटी ग्लासेसवर भर देत आहेत. आपल्या पदाचा राजीनामा देण्यापूर्वी ते यावर कठोर परिश्रम घेत आहेत. गार्मन यांच्या मते, Apple कंपनी पुढील वर्षी AR, VR हार्डवेअर स्पेस आणि मिक्स्ड रिअॅलिटी हेडसेट मध्ये आपला प्रवास सुरू करू शकते.

नव्या सीईओंची नियुक्ती कधी?

गार्मन पुढे म्हणाले की, Apple आणि कुक यांच्यात 2025 पर्यंतचा करार आहे. अशा परिस्थितीत, कंपनीचे नवीन सीईओ 2025 मध्येच नियुक्त केले जाऊ शकतात.

इतर बातम्या

अवघ्या 25 हजारात खरेदी करा जबरदस्त मायलेज देणारी बाईक, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

अवघ्या 92 हजारात घरी न्या Maruti ची 31 KM मायलेज देणारी कार, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

Vivo Special Offer : स्मार्टफोनची स्क्रीन फुटली तर मोफत बदलून मिळणार, 10000 रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स

(Tim Cook probably leaving Apple in 2025)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI