WhatsApp कॉल रेकॉर्ड करायचाय? ‘हा’ सोपा जुगाड वापरून बघा!
नॉर्मल कॉल रेकॉर्ड करता येतो, पण WhatsApp कॉलचं काय? कधी कामासाठी किंवा पुरावा म्हणून रेकॉर्डिंग हवं असतं. व्हॉट्सॲपमध्ये डायरेक्ट ऑप्शन नाही, पण एक सोपा 'जुगाड' आहे! काय आहे हा जुगाड ? चला जाणून घेऊया.

आपल्या मोबाईलवर येणारे नेहमीचे फोन कॉल्स रेकॉर्ड करणं अनेकांना माहीत असतं आणि काहीवेळा गरजेचंही वाटतं. पण व्हॉट्सअॅपवरून केलेले ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉल्स कसे रेकॉर्ड करायचे? हा प्रश्न अनेकांना पडतो. कधी कधी कामासाठी किंवा पुरावा म्हणून व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्डिंगची गरज भासू शकते. तर, हे शक्य आहे का? आणि असेल, तर ते कसं करायचं? चला जाणून घेऊया.
सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की, व्हॉट्सअॅप स्वतःहून कॉल रेकॉर्ड करण्यासाठी कोणतंही अधिकृत फीचर देत नाही. त्यामुळे नॉर्मल कॉलप्रमाणे तुम्ही व्हॉट्सअॅप कॉल थेट रेकॉर्ड करू शकत नाही. पण यासाठी एक वेगळा मार्ग किंवा एक ‘ट्रिक’ वापरावी लागते.
कोणती आहे ही ‘ट्रिक’?
व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्ड करण्यासाठी सध्याचा सोपा मार्ग म्हणजे स्क्रीन रेकॉर्डिंगचा वापर. जर तुम्ही फोनमध्ये स्क्रीन रेकॉर्डिंग चालू केली, तर तुमच्या स्क्रीनवर होणारे सर्व क्रिया आणि आवाज रेकॉर्ड होऊ शकतात, ज्यात व्हॉट्सअॅप कॉलचे संभाषणही समाविष्ट होईल.
तुमच्या फोनमध्ये आहे का हे फीचर?
आजकाल स्मार्टफोन कंपन्या अनेक फोनमध्ये स्क्रीन रेकॉर्डिंगची सुविधा पुरवतात. तुम्ही फोनच्या सेटिंग्ज किंवा नोटिफिकेशन पॅनलमध्ये तपासू शकता. तुम्हाला हे फीचर मिळाल्यास, तुम्ही व्हॉट्सअॅप कॉल्स सहज रेकॉर्ड करू शकता.फोनमध्ये नसेल तर? तिसऱ्या ॲपचा वापर करता येईल.
Third-party स्क्रीन रेकॉर्डिंग ॲप इंस्टॉल करताना ‘ही’ सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे
1. अॅप इंस्टॉल करण्यापूर्वी त्याचे रिव्ह्यूज आणि डेव्हलपर तपासा.
2. कोणत्याही संशयास्पद अॅप्सपासून दूर राहा.
3. अॅपने मागितलेली परवानगी नीट तपासा.
