AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WhatsApp वर आलेला Voice Message ऐकायला वेळ नाही? आता नो टेन्शन, थेट वाचा तुमचा मेसेज

व्हॉट्सॲपवर मित्राचा लांबलचक व्हॉइस मेसेज आलाय, पण तुम्ही आहात महत्त्वाच्या मीटिंगमध्ये किंवा कानाला हेडफोन नाहीत आणि आजूबाजूला गर्दी आहे? आता काय करायचं? मेसेज ऐकताही येत नाही आणि त्यात काय महत्त्वाचं आहे ते कळायलाही मार्ग नाही! तुमची हीच अडचण आता WhatsApp ने दूर केली आहे.

WhatsApp वर आलेला Voice Message ऐकायला वेळ नाही? आता नो टेन्शन, थेट वाचा तुमचा मेसेज
| Edited By: | Updated on: May 07, 2025 | 11:23 AM
Share

व्हॉट्सअ‍ॅपवर आपले रोजचे व्हॉइस मेसेज पाठवणे आणि ऐकणे, हे सर्वांसाठी अगदी सामान्य झाले आहे. कधी कामासाठी, कधी विनोदासाठी, तर कधी महत्त्वाचे संदेश देण्यासाठी व्हॉइस मेसेज पाठवले जातात. पण, प्रत्येक वेळी त्या मेसेजचे ऐकणे आव्हानात्मक होऊ शकते कधी काही आवाजामुळे ऐकू येत नाही, कधी सार्वजनिक ठिकाणी ते ऐकता येत नाही. अशा परिस्थितीत एक मोठं प्रश्न: व्हॉइस मेसेज ऐकायचं तरी कसं?

WhatsApp ने आणला एक भन्नाट उपाय!

व्हॉट्सअ‍ॅपने यावर एक नवीन आणि जबरदस्त फीचर आणलं आहे व्हॉइस मेसेज ट्रान्सक्रिप्शन. आता तुम्ही तुमचा व्हॉइस मेसेज ऐकू न जाता, तो स्क्रीनवर वाचू शकता! सोप्या भाषेत सांगायचं तर, व्हॉट्सअ‍ॅप तुमच्या व्हॉइस मेसेजमधील आवाजाला आपोआप टेक्स्टमध्ये बदलतो, आणि तुम्हाला समोरच्या व्यक्तीने काय सांगितलंय, ते सापडतं.

सुरक्षितता आणि प्रायव्हसी बाबत काय?

यावर एक मोठं प्रश्न असू शकतं हा ट्रान्सक्रिप्शन फीचर वापरताना तुमची प्रायव्हसी धोक्यात येत नाही ना? तर उत्तर आहे ‘नाही’ व्हॉट्सअ‍ॅपचं म्हणणं आहे की, तुमचा व्हॉइस मेसेज कधीच त्यांच्या सर्व्हरवर जात नाही. तो पूर्णपणे तुमच्या फोनवरच ट्रान्सक्रिप्ट केला जातो. आणि हेसुद्धा ‘End-to-End Encryption’ द्वारे सुरक्षित असतो, म्हणजेच तुमचा मेसेज कधीच तिसऱ्या व्यक्तीला ऐकता किंवा वाचता येणार नाही.

फीचर वापरण्याचा स्टेप बाय स्टेप मार्गदर्शक

WhatsApp उघडा

वरच्या तीन डॉट्सवर क्लिक करून ‘Settings’ मध्ये जा

‘Chats’ ऑप्शन निवडा

इथे तुम्हाला ‘Voice Message Transcripts’ नावाचा पर्याय सापडेल

तो टॉगल करून ऑन करा

तुमच्यासाठी उपयुक्त भाषा निवडा (उदा. हिंदी, इंग्रजी). पहिल्यांदा वापरत असाल, तर भाषेचं पॅकेज डाउनलोड करावं लागेल.

मेसेज आल्यानंतर काय करायचं?

एकदा हे फीचर सक्रिय केल्यावर, तुम्हाला आलेला व्हॉइस मेसेज वाचण्यासाठी:

त्या मेसेजवर थोडा वेळ बोट ठेवून दाबा

समोर आलेल्या पर्यायांमधून ‘Transcribe’ निवडा

आणि… काही सेकंदांत आवाजाचं टेक्स्टमध्ये रूपांतर तुमच्यासमोर हजर!

सद्याच्या स्थितीत हे फीचर हळूहळू Android आणि iOS वापरकर्त्यांसाठी उपलब्ध केलं जात आहे. तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये अजून हा पर्याय दिसत नसेल, तर घाबरू नका! तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपला अपडेट करा आणि लवकरच तुम्हाला हेसुद्धा दिसेल.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.