1 किंवा 2 नाही तर बाजारात आहेत एसीचे 4 प्रकार, तुम्हालाही नसेल ठाऊक त्यांची नावे…
बाजारात Air Conditioner किती प्रकार आहेत? तुम्हाला या प्रश्नाचे बरोबर उत्तर माहित आहे का? कारण अनेकांना बाजारात एसीचे एकुण किती प्रकार आहेत हे माहित नाही, तर आजच्या या लेखात आपण एसी प्रकार किती आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात...

आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरात एसी हा आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एसीची थंड हवा ही उष्णतेपासून आराम देते. आता एसीचा वापर हा दिवसेंदिवस वाढत आहे. आजकाल 12 महिने एसीचा वापर केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का आपण वापरत असलेल्या या एसीचे किती प्रकार आहेत? बहुतेक लोकांना विंडो एसी, स्प्लिट एसी आणि पोर्टेबल एसी बद्दल माहिती आहे, परंतु बाजारात हे तीनच नाही तर चार प्रकारचे एअर कंडिशनर उपलब्ध आहेत. चौथ्या एअर कंडिशनरचे नाव टॉवर एसी आहे आणि आज आपण टॉवर एसीबद्दल जाणून घेणार आहोत.
लोकांना बहुतेकदा विंडो, पोर्टेबल आणि स्प्लिट एसींची माहिती असते कारण लोकं बहुतेकदा घरासाठी यापैकीच एखादे मॉडेल खरेदी करतात, परंतु आज आम्ही तुम्हाला टॉवर एसीबद्दल सांगणार आहोत जसे की टॉवर एसी म्हणजे काय आणि बाजारात तो किती किमतीत उपलब्ध आहे?
टॉवर एसी म्हणजे काय?
टॉवर एसीला स्टँडिंग एसी असेही म्हणतात कारण या प्रकारचा एसी तुमच्या जवळ नेहमीच उभा राहणाऱ्या दिसतील. टॉवर एसी मोठ्या जागा थंड करण्यासाठी डिझाइन केलेले आहे, या प्रकारच्या एसीची खासियत अशी आहे की विंडो आणि स्प्लिट एसीच्या तुलनेत, टॉवर एसी पोर्टेबल आहे जो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे हलवता येतो.
टॉवर एसीचे फायदे
- इंस्टॉलेशन
- सहज हलवता येते.
- मोठ्या खोल्यांसाठी लवकर थंड करण्याची क्षमता
- टॉवर एसी लावताना कोठेही भिंतीला तोडफोड करण्याची गरज नाही
किंमत किती आहे?
व्होल्टास कंपनीचा 2 टन क्षमतेचा टॉवर एसी अमेझॉनवर उपलब्ध आहे जो 79,900 रुपयांना खरेदी करता येतो. तर Amazon व्यतिरिक्त, Cruise च्या अधिकृत साइटवर फ्लोअर स्टँडिंग एसी देखील उपलब्ध आहेत, परंतु क्रूझ कंपनीच्या ३ टन एसींची किंमत 1,24,990 रुपये, तर ४ टन एसींची किंमत 1,49,990 रुपये आणि५ टन एसींची किंमत 1,79,990 रुपये इतकी आहे.
Amazon वर 100 सीसी एसीची किंमत पाहून एक गोष्ट स्पष्ट होते की टॉवर एसीची किंमत विंडो एसी, स्प्लिट एसी आणि पोर्टेबल एसीपेक्षा जास्त आहे. आता तुमच्या घरासाठी कोणता एसी निवडायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे.
