कुणाचे काय, तर कुणाचे काय? टँकरला अपघात, लोकांची तेल गोळा करण्यासाठी धावपळ

बांदा येथील रस्त्यावर तेलाचा टँकर पलटी झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. ही बातमी कळताच परिसरातील लोक धावत सुटले. त्यांनी बादल्या, टाक्या, ड्रम आणून रस्त्यावर सांडलेले तसेच टँकरमधील तेल भरून घरी नेले.

कुणाचे काय, तर कुणाचे काय? टँकरला अपघात, लोकांची तेल गोळा करण्यासाठी धावपळ
लखनौमध्ये तेलाच्या टँकरला अपघातImage Credit source: Aaj Tak
Follow us
| Updated on: Oct 22, 2022 | 2:37 PM

लखनौ : निवडणुका आल्या की बरेच राजकीय पक्ष काही ना काही वाटप करतात. कुठेतरी, काहीतरी वाटप चाललेय, याची बातमी कळताच लोक धावत सुटतात. असाच प्रकार अनेकदा अपघातांच्या घटनांच्या वेळी घडतो. उत्तर प्रदेशमध्ये टँकर पलटी (Tanker Overturned in Uttar Pradesh) झाल्यानंतर लोकांनी अपघातावेळी रस्त्यावर सांडलेले तसेच टँकरमधील तेल भरण्यासाठी (To collect oil from tankers) बराच आटापिटा केला. तब्बल 43 लाखांचे मोहरीचे तेल (Mustard oil) स्थानिकांनी आपल्या घरात नेले. स्थानिकांची ही चपळाई चर्चेचा विषय बनली असून पोलीस अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.

बांदा येथील रस्त्यावर तेलाचा टँकर पलटी झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. ही बातमी कळताच परिसरातील लोक धावत सुटले. त्यांनी बादल्या, टाक्या, ड्रम आणून रस्त्यावर सांडलेले तसेच टँकरमधील तेल भरून घरी नेले. काहींनी या घटनेचा व्हिडिओ बनवला असून तो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे.

दुभाजकाला धडकला टँकर

बांदा येथील सतना रोडवर ही घटना घडली. राईच्या तेलाचा टँकर रस्त्याच्या दुभाजकाला जोरात धडकला आणि रस्त्याच्या मधोमधच पलटी झाला. या दुर्घटनेत ड्रायव्हर आणि क्लीनर बालबाल बचावले. परंतु टँकर चालकाला लाखो रुपयांच्या नुकसानीचा फटका बसला. अपघाताचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले.

हे सुद्धा वाचा

तेल नेण्यासाठी शेकडो लोक एकमेकांवर तुटून पडले

तेलाचा टँकर पलटी झाला असल्यामुळे नक्कीच तेल सांडले असणार. असा अंदाज बांधून परिसरातील शेकडो लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. अनेकांनी सोबतच बादल्या, टाक्या, ड्रम आणले होते.

काही वेळानंतर आपल्याला काहीच मिळणार नाही, असा समज करीत अनेकजण तेल भरण्यासाठी एकमेकांवर तुटून पडले. लोकांची ही धावपळ पाहण्याव्यतिरिक्त टँकरच्या चालक व क्लीनरकडे दुसरा पर्याय उरलेला नव्हता.

शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. महेंद्रगड दादरी महामार्गावरील पाले गावाजवळ हा टँकर पलटी झाला. टँकर चालकाने घटनेची माहिती टँकरचा मालक व पोलिसांना दिली. 112 क्रमांकच्या हेल्पलाइन नंबरवर अपघाताचे वृत्त मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

विशेष म्हणजे पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतरही लोकांनी टँकरमधील तेल घरी नेण्याचा सपाटा सुरू ठेवला होता. टँकरमधील संपूर्ण तेल संपल्यानंतरच लोकांनी अपघातस्थळी येणे थांबवले.

टँकरमध्ये होते 28 टन तेल

टँकर चालकाच्या माहितीनुसार, अपघातग्रस्त टँकरमध्ये तब्बल 28 टन तेल होते. त्याची किंमत जवळपास 43 लाख रुपयांच्या घरात होती. अपघातामुळे टँकरमालकाला या मोठ्या नुकसानीचा फटका सहन करावा लागला आहे. याप्रकरणी सध्या पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.