AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रब ने बना दी जोडी ! ब्रिटीश अधिकारी कामानिमित्त भारतात आली अन् सूनच झाली , ‘Incredible India’

जगात कधी कुठं काय होईल हे सांगता येत नाही. अशीच एक गंमत नुकतीच दिल्ली मध्ये घडली आहे. दिल्लीमध्ये (Delhi) कार्यरत असलेल्या ब्रिटनच्या डेप्युटी ट्रेड कमिशनरने (Deputy trade Commissioner) एका भारतीय तरुणाच्या प्रेमात पडली आहे. नुकतच या दोघांच लग्न (Marriage) देखील झाले आहे.

रब ने बना दी जोडी ! ब्रिटीश अधिकारी कामानिमित्त भारतात आली अन्  सूनच झाली , 'Incredible India'
Rhiannon Harries
| Updated on: Feb 19, 2022 | 8:23 AM
Share

मुंबई : जगात कधी कुठं काय होईल हे सांगता येत नाही. अशीच एक गंमत नुकतीच दिल्ली मध्ये घडली आहे. दिल्लीमध्ये (Delhi) कार्यरत असलेल्या ब्रिटनच्या डेप्युटी ट्रेड कमिशनरने (Deputy trade Commissioner) एका भारतीय तरुणाच्या प्रेमात पडली आहे. नुकतच या दोघांच लग्न (Marriage) देखील झाले आहे. रायन हॅरीसनेही स्वत: सोशल मीडियावर या बद्द्ल पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. तिच्या लग्नाची छोटीशी गोष्ट तीने या पोस्टमध्ये सांगितली आहे. ट्विटर प्रोफाइलनुसार, हॅरीसला फिरण्याची आवड आहे. भारत आता तिचे कायमचे घर आहे या गोष्टीची तिला खूप आनंद होत असल्याचे ती म्हणतं आहे. नेटकऱ्यांनीही तिचे स्वागत अगदी मनापासून केलं आहे.

काय आहे सोशल मीडिया पोस्ट :

रायन हॅरीसनेही आपल्या लग्नाची बातमी एका ट्विटमध्ये सोशल मीडियावर शेअर केली आहे. रायन हॅरीसने सांगितले की, अनेक आशा आणि स्वप्ने घेऊन 4 वर्षापूर्वी ती भारतात आली होती. पण इथे आल्यानंतर तिला आयुष्यभराचं प्रेम मिळेल तिचं लग्नही होईल असं स्वप्नातही तिला वाटलं नव्हतं. या पोस्ट सोबत तीने लग्नाचा फोटो ट्विटरवर शेअर करताना Incredible India हॅशटॅगचा वापर केला आहे. भारत आता तिचे कायमचे घर आहे याचा तिला खूप आनंद होत असल्याचे हॅरीचे म्हणणे आहे. त्याने #IncredibleIndia तसेच #shaadi #livingbridge #pariwar हॅशटॅग देखील वापरले आहेत.

डेप्युटी हाय कमिशनरने घेतली दखल

रायन हॅरीसच्या या लग्नाची दखल आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील ब्रिटनचे डेप्युटी हाय कमिशनर (Deputy High Commissioner Britain)अँड्र्यू फ्लेमिंग यांनी घेतली आहे. त्यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लग्नाबद्दल अभिनंदन केले आहे. या पोस्टमध्ये नवीन जीवन सुरू केल्याबद्दल रियानॉन हॅरीचे अभिनंदन. संपूर्ण ब्रिटीश उच्चायुक्तालय हैदराबादच्या वतीने तिला शुभेच्छा. त्याच प्रमाणे काही कारणास्तव विवाहसोहळ्याला उपस्थित राहू न शकल्याचे दु:ख देखील व्यक्त केले.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

रायन हॅरीसने आपल्या ट्विटमध्ये भारतात लग्न करणे खूप खास म्हटले आहे. त्याच वेळी, भारतातील सोशल मीडिया नेटकऱ्यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले केले आणि अनेक मनोरंजक कमेंट्स केल्या. ट्विटरवर सौरव @W8सौरव यांनी लिहिले की 1.3 अब्ज लोकांच्या कुटुंबात आपले स्वागत आहे. अनेकांनी तुम्हा दोघांना वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. एका यूजरने लिहिले – ‘भारतीय पर्यटन’मध्ये भारतीय लग्न, भारतीय संस्कृती, भारतीय सण यांचा समावेश असावा या गोष्टी पर्यटकांनी नक्कीच अनुभवल्या पाहिजेत. यावर अँड्र्यू फ्लेमिंगने उत्तर दिले की ही एक कल्पना आहे. कदाचित तुम्ही जी किशन रेड्डी (भारताचे पर्यटन आणि संस्कृती मंत्री) यांना टॅग करावे.

viral comments

viral comments

रायन हॅरीचा नवरा नक्की आहे तरी कोण ?

रायन हॅरीसने आपल्या ट्विटमध्ये पतीची कोणतीही खास माहिती शेअर केलेली नाही. यावर @JabarBarnel वापरकर्त्याने विचारले की हे गृहस्थ कोण आहेत? तर अँड्र्यू फ्लेमिंगने उत्तर दिले – तिचा नवरा भाग्यवान माणूस आहे.

संबंधीत बातम्या  :

…अन् असा ‘धप्पा’ दिला, की आईही घाबरली; वाघाचा ‘हा’ Cute video झालाय Viral

Cat dog video : कुत्रा तुपाशी, मांजर उपाशी! ‘असा’ लगावला ‘मौके पे चौका’ की नेटिझन्स म्हणतायत, हा तर Smartdog!

#Earthquake : भूकंपानंतर आला महापूर पण Memesचा! ‘हा कधी झाला?’ म्हणत सोशल मीडियावर उडवताहेत खिल्ली

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.