महिलेचा अचानक हृदयविकाराचा झटका, कुत्र्याने ओळखला धोका, मग केले असे काही की मालकिणीचे वाचले प्राण!
Dog save life : एका कुत्र्याने मालकिणीचे प्राण वाचवले. महिलेला अचानक हृदयविकाराचा झटका आला होता. कुत्र्याने धोका ओळखला आणि मग चमत्कार झाला. कसे वाचले त्या महिलेचे प्राण?

सध्या जीवनाचा काही भरवसा नाही. ऐन तारुण्यात आलेल्या मुलांना पण हृदयविकाराचा झटका येत आहे. कोणाची केव्हा जीवनयात्रा संपेल हे काही सांगता येत नाही. कधी कधी तर दैवबलवत्तर म्हणून एखाद्याचे प्राण वाचतात. असाच काहीसा प्रकार या महिलेसोबत घडला. एका कुत्र्याने तातडीने मदत केल्याने तिचे प्राण वाचले. इंग्लंडमधील जीनेट गॉडसेल या एक प्रशिक्षक आहेत. त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. हा धोका कुत्र्याने ओळखला आणि त्याने जे काही केले, त्यामुळे जीनेट यांचे प्राण वाचले.
घरी येताच हृदयविकाराचा झटका
58 वर्षांच्या जीनेट या प्रशिक्षण देण्याचे काम करतात. त्या रोज अनेक लोकांच्या संपर्कात असतात. कुत्र्यांची देखभाल आणि त्यांच्या संगोपनाचा विषय त्यांच्या जिव्हाळ्याचा आहे. दरम्यान त्या प्रशिक्षण देऊन घरी पोहचल्या. तेव्हा त्यांना थोडं अस्वस्थ वाटलं. त्या सोफ्यावर बसल्या.
कुत्र्याने ओळखला धोका
त्यांचा कुत्रा वॉटसन हा घरातच होता. जीनेट यांची अवस्था पाहून त्याला त्या अस्वस्थ असल्याचे लक्षात आले. त्याने लागलीच मालकिणीला घराच्या बाहेर बागेकडे ओढण्याचा प्रयत्न केला. पण जीनेट याने तिच्याकडे दुर्लक्ष केले. तेव्हा तो जोर जोरात भुंकू लागला. जीनेट या वरील रुममध्ये जाऊन आराम करण्याच्या विचारात होत्या. त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने आपण आराम करावा असे त्यांना वाटत होते. पण वॉटसन यांने त्यांना वरच्या मजल्यावरील रुममध्ये जाण्यापासून रोखले. त्याने पायऱ्यापासूनच त्यांना माघारी सोप्यावर आणले. वॉटसन सारखा जोर जोरात भूंकू लागला. त्याला जीनेट यांनी बाहेर जाऊन मदत मागावी असे वाटत असावे. शेजारील बंगल्यातील सू की यांना हा प्रकार अजब वाटले. वॉटसन आज इतका कशामुळे भूंकत आहे हे पाण्यासाठी त्या काळजीपोटी तातडीने पाहायला आल्या. त्यांनी लागलीच ॲम्बुलन्सला फोन केला. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले.
रुग्णालयात त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. ब्लॉकेजमुळे ह़दय विकाराचा झटका त्यांना आला. पण ते त्यांच्या लक्षात आले नव्हते. योग्य तो उपचार केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यांना त्यांच्या कुत्र्याने जणू जीवनदानच दिले होते. जीनेट यांनी कुत्र्याचे आणि सू की यांचे आभार व्यक्त केले. त्यांच्यामुळे त्या नवीन पहाट पाहु शकत होत्या.
