Raj Thackeray : राज ठाकरेंच्या त्या ट्वीटने शिंदें सेनेसह भाजपाच्या पोटात गोळा; उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना म्हणाले काय?
Raj Thackeray Tweet : उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज ठाकरे मातोश्रीवर आले. त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यामुळे राजकारण ढवळून निघाले नाही तोच राज ठाकरे यांनी अजून एक बॉम्ब टाकला आहे. त्यामुळे मनसे-शिवसेना युतीची वाटचाल आश्वासक वळणावर आल्याचे मानल्या जात आहे.

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे मातोश्रीवर आले. त्यांनी मोठ्या भावाला शुभेच्छा दिल्या. मुंबईतील या घडामोडींनी राज्याचे राजकारण ढवळून निघाले. पण त्यात राज ठाकरे यांनी अजून एक बॉम्ब टाकला. राज ठाकरे यांनी त्यांच्या एक्स हँडलवरुन एक ट्वीट केले आहे. त्या ट्वीटने राजकारणात मोठा धमाका उडवून दिला आहे. एकाच वाक्याने राजकारणात नवीन आयाम तयार झाले आहेत. तर भाजप आणि शिंदेसेनेला पण त्यातून मोठा इशारा दिल्याचा दावा राजकीय विश्लेषक करत आहेत.
राज ठाकरे यांनी दिल्या शुभेच्छा
आज उद्धव ठाकरे यांचा 65 वा वाढदिवस आहे. गेल्या 20 वर्षांपासून या वाढदिवसाला राज ठाकरे यांची अनुपस्थिती सर्वांनाच बोचत होती. पण दोन्ही ठाकरेंच्या दिशा आणि राजकीय समीकरणं वेगळी होती. पण या 5 जुलैपासून दोन्ही ठाकरेंच्या दिशा जुळाल्या. विचारातील तफावत कमी झाली आणि नवीन अजेंड्यासह दोन्ही पक्षांची एकाच रस्त्यावरून वाटचाल होत असल्याचे समोर येत आहे. 6 वर्षांपूर्वी जानेवारी 2019 मध्ये राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले होते. मुलगा अमित याची लग्न पत्रिका देण्यासाठी त्यांनी त्यावेळी भेट घेतली होती. तर आता उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दोन्ही ठाकरे पुन्हा एकत्र आले.
बाळासाहेबांचा फोटो, दोन्ही ठाकरे
आजच्या गाठीभेटीतून दोन्ही ठाकरेंनी महायुतीला थेट संदेश दिल्याचे मानल्या जाते. राज ठाकरे यांनी एक पाऊल पुढे टाकत मोठ्या भावाच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री जवळ केले. त्यानंतर दोन्ही ठाकरेंमध्ये 20 मिनिटे चर्चा झाली. निरोप घेण्यापूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या तसबीरीसमोर एकत्र येत फोटो घेतला. यातून त्यांनी महायुतीला जो संदेश द्यायचा होता, तो बरोबर पोहचवला. पण राज ठाकरे यांच्या एका ट्वीटने हा संदेश स्पष्टपणे समोर आला.
माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या… pic.twitter.com/sFp2Hduubx
— Raj Thackeray (@RajThackeray) July 27, 2025
त्या ट्वीटची जोरदार चर्चा
तर राज ठाकरे यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून एक ट्वीट केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हे ट्वीट त्यांनी केले. त्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा त्यांचा फोटो त्यांनी शेअर केला आहे. ” माझे मोठे बंधू, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या.” असे ट्वीट राज ठाकरे यांनी केले आहे. त्यांच्या या ट्वीटमधून त्यांनी योग्य तो संदेश दिल्याचे बोलले जात आहे. विशेषतः भाजप आणि शिंदे सेनेला हा स्पष्ट इशारा मानण्यात येत आहे. तर मनसे-शिवसेना युतीची वाटचाल आश्वासक वळणावर आल्याचे मानल्या जात आहे.
