Flipkart Freedom Sale 2025 मध्ये संधीचा घ्या फायदा, ‘हे’ 7 स्मार्टफोन ठरेलत सर्वात स्वस्त
फ्लिपकार्ट फ्रीडम सेल 2025 मध्ये ब्रँडच्या स्मार्टफोनवर मोठी सूट मिळत आहे. 8 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये, आयसीआयसीआय आणि बँक ऑफ बडोदा कार्डद्वारे पेमेंट केल्यास 10 टक्के अतिरिक्त सूट दिली जात आहे. कोणत्या मॉडेलवर किती सूट मिळेल ते आपण जाणून घेऊयात...

तुम्हीही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात, पण बजेटमुळे खरेदी करू शकत नाहीये? तर आता चिंता करू नका तुम्ही तुमच्या आवडीचा ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी करू शकतात तेही तुमच्या बजेटनुसार. कारण फ्लिपकार्ट फ्रीडम सेल 2025 मध्ये आयफोन, सॅमसंग, नथिंग, विवो आणि मोटोरोला सारख्या मोठ्या ब्रँडचे स्मार्टफोन मोठ्या सवलतींसह विकले जात आहेत. 8 दिवसांचा फ्लिपकार्ट सेल 8 ऑगस्टपर्यंत लाईव्ह असेल. आयसीआयसीआय बँक आणि बँक ऑफ बडोदा यांनी या सेलसाठी हातमिळवणी केली आहे.
याचा अर्थ असा की जर तुम्ही फोन खरेदी करताना यापैकी कोणत्याही बँक कार्डचा वापर करून पेमेंट केले तर तुम्हाला 10% इन्स्टंट डिस्काउंटचा फायदा मिळेल. बँक कार्ड डिस्काउंट व्यतिरिक्त, तुम्हाला जुना फोन एक्सचेंज केल्यावर अतिरिक्त डिस्काउंट आणि व्याजमुक्त ईएमआय सुविधा मिळेल.
फ्लिपकार्ट सेल ऑफर्स
आयफोन 16 ची किंमत: फ्लिपकार्ट सेलमध्ये हा आयफोन मॉडेल डिस्काउंटनंतर 69,999 रुपयांना विकला जात आहे, हा फोन लॉन्च किमतीपेक्षा 9,901 रुपयांनी स्वस्तात उपलब्ध आहे.
Samsung Galaxy S24 FE: सेल दरम्यान हा फोन डिस्काउंटनंतर 35,999 रुपयांना विकला जात आहे, सॅमसंगचा हा फोन 59,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता.
Samsung Galaxy S24: हा फोन 74,999 रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आला होता पण सध्या सेल दरम्यान हा फोन लाँच किमतीपेक्षा 28 हजार रुपयांनी कमी किमतीत उपलब्ध आहे. 28 हजार रुपयांच्या मोठ्या डिस्काउंटनंतर, हा फोन सध्या 46 हजार 999 रुपयांना विकला जात आहे.
आयफोन 16 ई: हा आयफोन मॉडेल 59, 900 रुपयांना लाँच करण्यात आला होता पण सध्या सेल दरम्यान हा फोन 54,900 रुपयांना विकला जात आहे.
Nothing Phone 3a: हा Nothing स्मार्टफोन 27,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे पण सध्या तुम्हाला हा फोन सेलमध्ये 21,999 रुपयांना मिळेल.
Vivo T4 5G: Vivo कंपनीचा हा मिड-रेंज फोन 21,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता, परंतु आता Flipkart Freedom Sale मध्ये हा फोन डिस्काउंटनंतर 20,999 रुपयांना विकला जात आहे.
