India Vs Pakistan : क्रिकेट महत्त्वाचा की देश?; तुम्ही आजचा भारत-पाक सामना पाहणार? पाहा काय म्हणातेय लोक
India Vs Pakistan : दुबईतील आजच्या भारत-पाकिस्तान सामन्यावर पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे तीव्र टीका आणि बहिष्काराची मागणी होत आहे. उच्चस्तरीय प्रचार असूनही तिकिट विक्री संथ गतीने होत आहे. स्टेडियममधील जवळपास निम्म्या जागाही अजून रिक्त आहेत.

आज, 14 सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला जाणार आहे. हा सामना दुबईमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. मात्र, संपूर्ण देशात पहलगाम हल्ल्यानंतर या सामान्याविरोधात तीव्र टीका केली जात आहे. सोशल मीडियावर अनेकांनी याला पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींना आणि आपले प्राण गमावलेल्या भारतीय सैनिकांना अपमान मानले आहे. तसेच सामन्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन देखील सोशल मीडियावर केले जात आहे. #BoycottIndvsPak हा हॅशटॅग देखील मोठ्या प्रमाणावर ट्रेंड होताना दिसत आहे. अनेकांनी हा सामना रद्द करण्याची मागणी केली आहे.
भारत-पाकिस्तान सामन्याच्या प्रचारानंतरही तिकिट विक्री का संथ आहे?
भारत-पाकिस्तान सामन्याच्या उच्चस्तरीय प्रचारानंतरही दुबईतील सामन्याची तिकिट विक्री अतिशय संथगतीने सुरु आहे. विक्री सुरू झाल्यापासून दहा दिवसांहून अधिक काळ लोटला तरी स्टेडियममधील जवळपास निम्या जाग्या रिक्त आहेत. या तिकिटांची किंमत 99 यूएस डॉलरपासून सुरू होते आणि प्रीमियम पॅकेजेस 4 लाख यूएस डॉलरपेक्षा जास्त आहेत. अनेक भारतीय चाहत्यांनी सामान्याला गैरहजर राहणे पसंत केले आहे.
#BoycottAsiaCup #BoycottINDvPAK
Can we, as a nation, collectively boycott the India vs Pakistan match in the Asia Cup? If BCCI cannot do it, but as a nation we can Jay Hind🫡🇮🇳 pic.twitter.com/a9EC06jSai
— jayaa 💜🩵 (@Jayaa2012) September 12, 2025
Agree ?? #BoycottINDvPAK pic.twitter.com/YJuyhIaMre
— Hinduism_and_Science (@Hinduism_sci) September 13, 2025
Indian public to BCCI:#BoycottINDvPAK #indiaVsPakistan pic.twitter.com/0e0JalsHEq
— Binod (@wittybinod) September 13, 2025
नेटकऱ्यांनी केली टीका
एकाने युजर या सामन्याविषयी लिहिले की, “आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना होऊ नये. काही दिवसांपूर्वीच निरपराध भारतीय शहीद झाले… देशहिताबद्दल बोलणारे आता का गप्प आहेत? क्रिकेट आणि पैसा इतके महत्त्वाचे आहे का? की त्यांनी पाकिस्तानच्या भ्याड कृत्याला इतक्या लवकर विसरले?” दुसऱ्या एका युजरने विचारले की, “आपण एक राष्ट्र म्हणून एशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामन्याचा सामूहिक बहिष्कार करू शकतो का? जर बीसीसीआय हे करू शकत नसेल, तर आपण एक राष्ट्र म्हणून हे करू शकतो. जय हिंद🫡🇮🇳” तिसऱ्या एका युजरने सल्ला दिला की, “तुमचे टीव्ही सुरू करू नका. त्यांना रेटिंग देऊ नका. या सामन्याचा बहिष्कार करा.”
