कोल्हापूरच्या माधुरी हत्तीणीने वाचवला लहान मुलाचा जीव? काय आहे व्हायरल व्हिडीओ मागचे सत्य?
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांचा दावा आहे की हा व्हिडीओ कोल्हापूरमधील माधुरी हत्तीणीचा आहे. व्हिडीओमध्ये हत्तीणीने जे केलं ते पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.

कोल्हापूरच्या नांदणी गावातील माधुरी हत्तीण सध्या सगळीकडेच सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. नुकताच तिला गुजरातमधील वनतारा येथे हलवण्यात आले, ज्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. माधुरीच्या समर्थनार्थ गावात मोर्चे आणि आंदोलने झाली. अशातच, सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. पण हा व्हिडीओ खरच माधुरी हत्तीणीचा आहे की इतर कोणत्या हत्तीणीचा आहे असा प्रश्न सर्वांना पडला आहे..
प्राण्यांवर प्रेम केलं तर तेही तेवढ्याच निष्ठेने प्रेम परत करतात, असं म्हणतात. अनेकजण आपल्या घरात प्राण्यांना कुटुंबाचा भाग बनवतात आणि माधुरी हत्तीणही नांदणी गावाची अशीच एक लाडकी सदस्य आहे. हत्ती हा स्वभावाने अत्यंत प्रेमळ प्राणी आहे आणि माधुरी तर गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ नांदणीच्या लोकांसोबत राहिली आहे. गावातील प्रत्येक कार्यक्रमात तिची उपस्थिती लक्षणीय असते. आता तिला वनतारामध्ये हलवल्यानंतर नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. दरम्यान, तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
व्हिडीओमध्ये नेमकं काय?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, माधुरीला पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमली आहे. याचवेळी एक लहान मुलगा तिच्या पिंजऱ्यात पडतो. सर्वजण काळजीत पडतात. आता माधुरी काय करणार? मुलाला तिच्यापासून कसं वाचवणार? पण माधुरीने आपल्या सोंडेने त्या मुलाला हळुवारपणे उचलून लोकांकडे सोपवले. हा भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळालेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी माधुरीच्या प्रेमळ स्वभावाचे कौतुक केले आहे.
नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स
सोशल मीडियावर माधुरीचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. पण कमेंट सेक्शनमध्ये यूजर्सचे म्हणणे आहे की हा व्हिडीओ माधुरी हत्तीणीचा नाही. एका यूजरने लिहिले की, ‘हा व्हिडीओ चीनमधील आहे.’ दुसऱ्या एका यूजरने ‘हा AIने बनवलेला व्हिडीओ आहे.’ त्यामुळे हा व्हिडीओ माधुरीचा आहे की चीनमधील एका हत्तीचा आहे हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही)
