VIDEO : या आजोबांचा नागिन डान्स पाहिला?, व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
सोशल मीडियावर तुफान गाजत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक आजोबा हातात रुमाल घेऊन पुंगी वाजवत आहेत, तर दुसरे आजोबा नागिन डान्स करण्यात तल्लिन झाले आहेत.

व्यक्ती कितीही थकून भागून आला असला आणि एखादं गाण लावलं तर नक्कीच त्या व्यक्तीचा थकवा एका क्षणात दूर होतो. गाण्याच्या तालावर तो व्यक्ती आपोआप थिरकू लागतो. लहान असो किंवा वृद्ध संगीत सर्वांनाच वेड लावते. प्रत्येक जण आपली सर्व टेन्शन, चिंता विसरुन संगीतात रममाण होतो. संगीताची जादूच अशी आहे. असेच गाण्याच्या तालावर आपल्या सर्व चिंता, आपले वय विसरुन मोकळेपणाने थिरकणारे आजोबा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
सोशल मीडियावर तुफान गाजत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक आजोबा हातात रुमाल घेऊन पुंगी वाजवत आहेत, तर दुसरे आजोबा नागिन डान्स करण्यात तल्लिन झाले आहेत.
काय आहे या व्हिडिओत?
एका युजरने हा धम्माल व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. वय झाले की माणसे निराश किंवा आजारपणाला कंटाळलेली दिसतात. पण या आजोबांनी हे सर्व गैरसमज दूर केले आहेत. हे आजोबा आपल्या जोडीदारासोबत डान्स करत जीवनाचा आनंद लुटत आहेत.
उम्र क्या है! अगर मस्ती ज़िंदा है तो ही हस्ती ज़िंदा है। pic.twitter.com/aqP1DyYIdA
— Jaiky Yadav (@JaikyYadav16) November 7, 2022
व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या दोन्ही आजोबांनी पांढऱ्या रंगाचे धोतर आणि कुर्ता परिधान केला आहे. एक जण हातातील रुमाल बीन म्हणून वापरत आहे आणि दुसरे त्याच्यासमोर नागिन डान्स करत आहेत.
डीजे फ्लोअरवर झोपून हे आजोबा आधी सापासारखे लोळत आहेत, मग दोन्ही हात वर करून फणा काढत आहेत. आजोबांचा हा फनी डान्स पाहून लोकांचे भरपूर मनोरंजन होत आहे.
व्हिडिओला 47 हजारांहून अधिक व्ह्यूज
सोशल मीडियावर या व्हिडिओला 47 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी व्हिडिओवर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने म्हटले आहे की, आजच्या जमान्यात नागिन डान्स नामशेष होत चालला आहे. आजोबांना नाचताना पाहून छान वाटले. दुसऱ्या व्यक्तीने लिहिले आहे की, हा राजस्थानमधील लोकांचा व्हिडिओ आहे. अन्य एकाने लिहिले आहे की, आयुष्यात मजा करणे खूप गरजेचे आहे.
