अरारा खतरनाक… पॉप सुपरस्टारचा ॲनाकोंडावर उभं राहून डान्स, अख्खं जग हललं; व्हिडीओ व्हायरल
Jolin Tsai : तैवानची पॉप गायिका जोलिन त्साईने 30 मीटर लांब ॲनाकोंडा सापाच्या आकाराच्या स्टेजवर खतरनाक केला आहे. तिच्या या डान्सच्या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.

तुम्ही आतापर्यंत अनेक प्रकारचे डान्स व्हिडिओ पाहिले असतील, मात्र आता सोशल मीडियावर एका खतरनाक डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तैवानची पॉप गायिका जोलिन त्साईने 30 मीटर लांब ॲनाकोंडा सापाच्या आकाराच्या स्टेजवर खतरनाक केला आहे. तिच्या या डान्सच्या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. हा डान्स तिने ‘प्लेझर’ वर्ल्ड टूर दरम्यान केला आहे. याची सुरुवात 30 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान तैपेईमध्ये झाली आहे. या व्हिडिओबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
ॲनाकोंडावर उभं राहून डान्स
तैवानची पॉप गायिका जोलिन त्साई ही आशियातील सर्वात धाडसी लाइव्ह परफॉर्मर म्हणून ओळखली जाते. अशातच आता तिने ॲनाकोंडाच्या आकाराच्या स्टेजवर खतरनाक डान्स करत प्रेक्षकांना थक्क केले आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये ती एका मोठ्या आणि हलणाऱ्या सापाच्या आकाराच्या स्टेजवर नाचत आहे. या सापाला क्रू मेंबर्स एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यास मदत करत आहेत. यात प्रेक्षकही तिला दाद देताना पहायला मिळत आहे. अनेकांनी या परफॉर्मन्सला ‘सिनेमॅटिक’, ‘धाडसी’ आणि ‘आशियाई पॉप कॉन्सर्टमधील एक नवीन मापदंड’ असे म्हटले आहे.
तैपेईमधील एका मोठ्या स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या जोलिन त्साईच्या रात्रींच्या कॉन्सर्ट सीरिजला 1 लाख 20 हजारांपेक्षा जास्त लोकांनी हजेरी लावली होती. या ठिकाणी दररोज 40 हजार प्रेक्षक हजर होते. त्यामुळे हा या प्रदेशातील सर्वात मोठ्या पॉप कार्यक्रमांपैकी एक ठरला आहे.
ताइवान की मशहूर सुपर स्टार जोलिन त्साई ने ऐसे अंदाज मे डांस किया जिसे देखकर पूरी दुनिया हैरान हो गयी , एक बड़े से ऐनाकोंडा साँप पर खड़े होकर उस पर बेलेंस बनाकर अपने देश के लोगो को मज़बूत संदेश दिया , pic.twitter.com/8UezVc0GmR
— Shama Parveen (@ShamaParveen70) January 1, 2026
वर्ल्ड टूर साठी 200 कोटींचा खर्च
तैवानच्या ‘केबीआयझूम’ या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, त्साईने या वर्ल्ड टूरच्या निर्मितीसाठी 900 दशलक्ष तैवानी डॉलर्स (सुमारे 200 कोटी रुपये) खर्च केले आहे. यामुळे हा टूर आतापर्यंतच्या सर्वात महागड्या आशियाई पॉप टूर्सपैकी एक ठरणार आहे. या शोमध्ये स्टेजवर बैल, फुलपाखरे आणि डुक्कर यांचे लाईव्ह पुतळे पहायला मिळत आहेत. या टूरमध्ये जिवंत देखावे सादर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ज्यामुळे ते खास बनले आहे.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स व्हायरल
जोलिन त्साईचा ॲनाकोंडा सापावरील परफॉर्मन्सचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर, नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. एकाने “तो खरा ॲनाकोंडा आहे का?” असा प्रश्न विचारला आहे. दुसऱ्या एकाने, “एखादा अॅनाकोंडा इतका मोठा कसा असू शकतो?” असं म्हटलं आहे. तर इतर लोकांनी या शोच्या भव्यतेचे कौतुक केले आहे. आणखी एका नेटकऱ्याने म्हटले की, “तैवानची सुपरस्टार जोलिन त्साईचा नवीन कॉन्सर्ट ‘प्लेझर’ हा एका वेगळ्याच स्तरावरील कार्यक्रम आहे. दरम्यान, या परफॉर्मन्सने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.
