Video: नोरा फतेहीच्या गाण्यावर आफ्रिकन भावंडांचं भन्नाट लिपसिंक, व्हिडीओ पाहून लोक म्हणाले, हे तर बॉलीवूड स्टारच वाटतात!

हे आफ्रिकन बंधू-भगिनी तंझानियाचे रहिवासी आहेत. त्याचे अनेक व्हिडिओ आतापर्यंत सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याचा लेटेस्ट व्हिडिओ नोरा फतेहीच्या 'कुसु-कुसू' गाण्यावर आहे, ज्यामध्ये ते जबरदस्त लिपिंग करताना आणि डान्स करताना दिसत आहे.

Video: नोरा फतेहीच्या गाण्यावर आफ्रिकन भावंडांचं भन्नाट लिपसिंक, व्हिडीओ पाहून लोक म्हणाले, हे तर बॉलीवूड स्टारच वाटतात!
कुसू कुसू गाण्यावर आफ्रिकन बहिण भावाचं भन्नाट लिपसिंक

नोरा फतेही तिचा बोल्ड लूक, ग्लॅमरस स्टाइल आणि जबरदस्त गाण्यांमुळे केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध झाली आहे. तिची गाणी रिलीज होताच लोकांच्या ओठांवर आल्याशिवाय राहत नाहीत. सोशल मीडियावर तिच्या डान्सचे अनेक व्हिडीओ आहेत, ज्यांनी धुमाकूळ घातला आहे. सध्या ‘कुसू-कुसू’ हे गाणंही त्यात सामील झालं आहे. तिचं हे गाणे नुकतेच रिलीज झाले आहे आणि इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिच्या या गाण्यावर नुकतेच सोशल मीडियावर स्टार बनलेल्या आफ्रिकन बंधू-भगिनींनी जबरदस्त परफॉर्म केला आहे. (Viral Video of African siblings lipsync on Nora Fatehi song Kusu Kusu Amazing Video)

हे आफ्रिकन बंधू-भगिनी तंझानियाचे रहिवासी आहेत. त्याचे अनेक व्हिडिओ आतापर्यंत सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याचा लेटेस्ट व्हिडिओ नोरा फतेहीच्या ‘कुसु-कुसू’ गाण्यावर आहे, ज्यामध्ये ते जबरदस्त लिपिंग करताना आणि डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पारंपारिक पोशाख आणि दागिने घातलेली बहीण पुढे उभी आहे आणि गाण्यावर लिपसिंक करत आहे. तिच्या मागे तिचा भाऊ नाचत आहे आणि अशा अनेक मूव्ह देखील केल्या आहेत, ज्या आश्चर्यकारक आहेत.

व्हिडीओ पाहा:

View this post on Instagram

A post shared by Kili Paul (@kili_paul)

या दोन भावंडांचे लिपसिंक बघताना वाटत नाही की, त्यांना हिंदी येत नसेल. त्यांचे लिपिंग परफेक्ट दिसते. त्याचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर kili_paul नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. लोकांना हा व्हिडिओ किती आवडला आहे, याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, व्हिडिओला आतापर्यंत 1 मिलीयनहून अधिक म्हणजेच 10 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 35 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे.

हा अप्रतिम व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनीही उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, ‘कुसु कुसूची सर्वोत्कृष्ट आवृत्ती. ती मुलगी खूप सुंदर आहे आणि या मुलाच्या डान्स मूव्हजही अप्रतिम आहेत. तुम्ही दोघेही सुपर आहात’. इथं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हा व्हिडिओ ‘कुसू-कुसू’ गाण्याला आपला आवाज देणाऱ्या झारा खानलाही आवडला आहे. तिने कमेंटमध्ये लिहिले, ‘तुम्हाला माझ्या गाण्यावर नाचताना पाहून आनंद झाला. तुम्ही दोघं छान आहात’. याशिवाय अनेक युजर्सनी या गाण्यावर कमेंट करून आफ्रिकन बंधू-भगिनींच्या परफॉर्मन्सचं कौतुक केलं आहे.

हेही पाहा:

Video: माकडांचं टोळीयुद्ध पाहिलंय, जे पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल, हे खरंच आपलेच पूर्वज आहेत!

Video: मालकाने कोंबडीला पिंजऱ्यात डांबलं, त्यानंतर कोंबड्याने असं काही केलं की, नेटकरी कोंबड्याच्या प्रेमात पडले!

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI