Viral: टॉवेलच्या काठावर का असते अशी बॉर्डर? 99% लोकांना नसेल माहिती
Why Do Towels Have Decorative Border: इंटरनेटवर अनेकदा वेग-वेगळ्या विषयांवरुन वादविवाद होत असतात, मात्र यावेळी एक टॉवेल वादाचे कारण ठरला. होय, घरात रोज वापरल्या जाणाऱ्या या सामान्य वस्तूबाबत असा प्रश्न विचारला गेला की सगळेच आश्चर्यचकित झाले.

Why Do Towels Have Decorative Border: राजच्या वापरात अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपण कायम वापरत असतो. पण त्या वस्तू आकार आणि त्यावर असलेल्या डिझाईनचा कधीच विचार करत नाही. याचच एक उदाहरण आहे आणि ते म्हणजे, टॉवेल… टॉवेलच्या किनाऱ्यावर एका खास प्रकारची बॉर्डर असते. ती बॉर्डर तुम्ही देखील पाहिली असेल. जवळपास सर्वच टॉवेलवर ती डिझाईन असते. पण तुम्हाला माहिती आहे टॉवेलच्या किनाऱ्यावर ती डिझाईन का असते.
नुकताच एका व्यक्तीने इंटरनेटवर हाच प्रश्न विचारला, ज्यामुळे टॉवेलवर असलेल्या बॉर्डरचा विषय चर्चेत आला. एक सॉफ्टवेअर अभियंता Nate McGrady, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विनोदी अंदाजात म्हणतो, “या बॉर्डर मुद्दाम बनवल्या आहेत जेणेकरून टॉवेल लवकर फाटेल आणि नवीन विकत घ्यावा लागेल?” या प्रश्नाला लोकांनी मजेदार उत्तरे दिली, पण काहींनी खरी माहितीही शेअर केली.
what is the purpose of this part of a towel? pic.twitter.com/q4UYACVMDP
— Nate (@natemcgrady) March 13, 2025
टॉवेरच्या किनाऱ्यावर का असते बॉर्डर?
सांगायचं झालं तर, टॉवेलवर असलेल्या बॉर्डरला ‘डॉबी बॉर्डर’ असं म्हणतात. हा केवळ सजावटीचा भाग नाही तर त्याचा एक विशेष उद्देश आहे. ही बॉर्डर एका विशिष्ट प्रकारच्या घट्ट विणण्यापासून बनविली जाते. यामागे अनेक उपयुक्त कारणे आहेत.
सध्या पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एक्सवर @natemcgrady या अकाउंटवरून पोस्ट शेअर करण्यात आली आहे. टॉवेलवर असलेल्या बॉर्डरचं महत्तव सांगत एक नेटकरी म्हणाला, ‘ही बॉर्डर खरं तर एक ‘रेसिंग स्ट्राइप’ आहे. ज्यामुळे टॉवेल लवकर वाळण्यात मदत होते.’
एवढंच नाही तर, काही लोकांनी टॉवेल उत्पादक कंपन्यांवर म्हणजेच ‘बिग टॉवेल’वर आरोप केला की ते टॉवेलचा मऊपणा जाणूनबुजून कमी करतात, ज्यामुळे आम्हाला पुन्हा पुन्हा नवीन टॉवेल खरेदी करावे लागतात…. सध्या पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
