Video | 80 फुटांवरून उडी घेण्याचा प्रयत्न, बंजी जंपिंग करताना दोरी तुटताच महिलेचा मृत्यू, थरारक घटनेचा व्हिडीओ व्हायरल

बंजी जंपिंग करताना एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्याची प्रचिती नुकतीच आली आहे. बंजी जंपिंग करताना एका महिलासोबत मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये महिलेचा थेट मृत्यू झालाय. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video | 80 फुटांवरून उडी घेण्याचा प्रयत्न, बंजी जंपिंग करताना दोरी तुटताच महिलेचा मृत्यू, थरारक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
JUMPING ACCIDENT
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 10:46 PM

मुंबई : या जगात कोणाला कशाची आवड असेल हे सांगता येत नाही. काही लोकांना आवडीचे पदार्थ करण्याची आवड असते. तर एखाद्या व्यक्तीला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आवडते. काही लोकांना साहसी कारनामे करण्यामध्ये आनंद मिळतो. सध्या बंजी जंपिंग (Bungee Jumping) हा प्रकारही चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. बंजी जंपिंग करणे जेवढे सांहसपूर्ण आहे; तेवढेच ते धोक्याने भरलेले आहे. जंपिंग करताना एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्याची प्रचिती नुकतीच आली आहे. बंजी जंपिंग करताना एका महिलासोबत मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये महिलेचा थेट मृत्यू झालाय. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बंजी जंपिंग करताना महिलेचा मृत्यू 

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना कझाकिस्तान येथील असून दुर्घटनेत मृत्यू झालेल्या माहिलेचे नाव येवजीनिया लिओन्तिया (Yevgenia Leontyeva) असे आहे. या महिलेचे वय 33 वर्षे असून बंजी जंपिंग करताना तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या महिलेला तीन मुलं आहेत. ती कारागांडा शहरात फिरायला गेली होती. ती एका हॉटेलमध्ये थांबली होती. हॉटेलच्या छतावर जाऊन ही महिला बंजी जंपिंग करत होती. मात्र छतावरुन उडी घेताच तिचा मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं ?

येवजीनिया लिओन्तिया नावाची ही महिला हॉटेलच्या छतावर जाऊन बंजी जंपिंग करत होती. यावेळी तिच्यासोबत तिचा पतीदेखील असल्याचे सांगितले जात आहे. तिच्या कंबरेला तसेच पूर्ण अंगाला एका माणसाने दोरी बांधली आहे. नंतर या महिलेने थेट हॉटेलच्या छतावरुन उडी घेतली. मात्र, बंजी जंपिंग करण्यासाठी वापरण्यात येणारी दोरी कमकुवत असल्यामुळे अचानकपणे तुटली. दोरी तुटल्यामुळे महिला थेट खाली कोसळली. त्यानमंतर ती थेट समोरच्या भिंतीवर जाऊन आदळ्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

पाहा व्हिडीओ :

गुन्हा दाखल, पोलिसांकडून तपास सुरु 

हा प्रकार समोर आल्यानंतर महिलेला रुग्णालयात तत्काळ दाखल करण्यात आले. येथे महिलेवर उपचार करण्यात आले. मात्र, तिचे प्राण वाचू शकले नाहीत. महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. महिलेला दोरीने बांधणाऱ्या माणसाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

इतर बातम्या :

‘आमीरनंतर आता तुझं लग्नही तुटणार’ म्हणणाऱ्या ट्रोलरला रिचा चड्ढाचा भोली पंजाबन स्टाईल झटका!

Video: मालक आणि कुत्र्याच्या नात्यातला गोंडस व्हिडीओ, नेटकरी म्हणाले, आम्हालाही मिकाला किस करायचं आहे!

Video: मुलीसमोर कोब्रा, तरी कॅमेऱ्याला पोझ देत फोटोग्राफी, पाहा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ

(women fall down from hotel terrace while bungee jumping video went viral on social media)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.