जगातील सर्वात महागडी दारू कोणती? एक पेगच्या किंमतीत येईल लग्झरी फ्लॅट
मद्य प्रेमींना सतत कोणती दारु सर्वात महाग आहे? असा प्रश्न पडतो. नुकताच समोर आलेल्या माहितीनुसार एक अशी व्हिस्की आहे जिच्या किंमतीमध्ये एक आलिशान घर येईल. या व्हिस्कीच्या एका पेगची किंमत किती? जाणून घ्या...

जगातील सर्वात महागडी दारु कोणती असा प्रश्न नेहमीच सर्वांना पडतो. महागड्या व्हिस्कीचा मान इसाबेला इस्लेला मिळाला आहे. या व्हिस्कीच्या एका बाटलीची किंमत 60 लाख डॉलर, म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये सुमारे 52 कोटी रुपये आहे. आकर्षक पॅकेजिंगसह या प्रीमियम व्हिस्कीची गुणवत्ता देखील अप्रतिम आहे. पण असा कोणता व्यक्ती असेल जो जुहू किंवा मलबारहिलमधील आलिशान बंगल्याच्या किंमतीएवढी दारू खरेदी करून त्यात दोष शोधेल? खरं तर, तुम्ही या व्हिस्कीच्या किंमतीचा मोठा हिस्सा बाटलीसाठीच देत असता. ही व्हिस्की खरं तर तुमच्या बँक खात्याची ताकद दाखवण्याचा एक बहाणा आहे. जर तुम्ही ही खरेदी करू शकत असाल, तर तुम्ही खरंच श्रीमंत आहात!
पण यात काय खास आहे आणि ही इतकी महागडी का आहे?
खरं तर, ही व्हिस्की ठेवण्यासाठी वापरण्यात येणारी इंग्लिश क्रिस्टल डिकँटर ही हिऱ्यांनी सजवलेली एक कलाकृती आहे. यात 8,500 हून अधिक हिरे आणि 300 माणके (रुबी) जडवलेले आहेत. तसेच, दोन बार इतके व्हाइट गोल्ड वापरले गेले आहे. विशेष म्हणजे, बाटलीवर हिऱ्यांनी बनवलेले अक्षर खरेदीदाराच्या आवडीनुसार बदलता येऊ शकतात. याशिवाय, बाटलीच्या पुढील बाजूस लाल रंगातील लिखाण सुमारे 300 माणकांपासून बनवले आहे. त्याचबरोबर, या महागड्या बाटलीवर दोनदा पांढऱ्या सोन्याचा थर चढवण्यात आला आहे, जो ब्रिटिश कारागिरीचा उत्कृष्ट नमुना आहे. एवढंच नाही, प्रत्येक बाटली एका आलिशान लाकडी पेटीत ठेवली जाते. याच कारणांमुळे इसाबेला ओरिजिनलची किंमत सहा दशलक्ष डॉलर आहे.
एक पेगची किंमत किती?
इसाबेला इस्ले व्हिस्कीच्या एका बाटलीची किंमत सुमारे 52 कोटी रुपये आहे. या बाटलीत 750 मिली दारू आहे. जर 30 मिलीच्या एका पेगचा विचार केला, तर त्याची किंमत दोन कोटी रुपयांहून अधिक होऊ शकते. म्हणजेच, या व्हिस्कीचा एक पेग पिण्यासाठी तुम्हाला तुमची मालमत्ता विकावी लागेल. किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर, इतक्या पैशात तुम्ही जुहू किंवा मलबार हिलमध्ये एक लक्झरी फ्लॅट खरेदी करू शकता.
इसाबेला इस्ले व्हिस्की कुठून खरेदी करायची?
इसाबेला इस्ले व्हिस्कीच्या बाटल्या पेय बाजारात अत्यंत दुर्मीळ आहेत. त्या दुकानातून सहज खरेदी करता येत नाहीत, कारण इतक्या महागड्या बाटल्या ठेवण्याची हिंमत फार कमी दुकानदार जुटवू शकतात. या बाटल्या मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे थेट डिस्टिलरीशी संपर्क साधणे.
