Petrol price: ऐन दिवाळीत इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल 115 तर डिझेलने 110 रुपयांचा टप्पा ओलांडला

भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या भावात प्रत्येकी 35 पैशांची वाढ केली आहे. त्यानुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 115.50 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 106.62 रुपये मोजावे लागत आहेत. | Petrol price

Petrol price: ऐन दिवाळीत इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल 115 तर डिझेलने 110 रुपयांचा टप्पा ओलांडला
पेट्रोल-डिझेल
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 7:31 AM

नवी दिल्ली: भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दररोज नवनवे उच्चांक प्रस्थापित करत आहे. ऑक्टोबर महिना संपेपर्यंत पेट्रोलने प्रतिलीटर 115 तर डिझेलने 110 रुपये प्रतिलीटरची पातळी गाठली आहे. त्यामुळे लवकर इंधनाचे दर 120 रुपयांच्या पलीकडे जातील, असा अंदाज आहे. यामुळे ऐन दिवाळीत महागाईचा भडका उडण्याची शक्यता असून त्यामुळे सामान्य नागरिक चिंतेत पडले आहेत.

भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या भावात प्रत्येकी 35 पैशांची वाढ केली आहे. त्यानुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 115.50 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 106.62 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 109.34 आणि 98.42 रुपये इतका आहे.

ओपेक देशांची बैठक

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या खनिज तेलाचे दर कडाडले आहेत. या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात तेल उत्पादक देशांच्या ओपेक या संघटनेची महत्त्वाची बैठक होणार आहे. ओपेक या संघटनेत इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला या देशांचा समावेश आहे. 1960 साली या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून जागतिक पातळीवरील खनिज तेलाच्या पुरवठ्यावर आणि किंमतीवर या संघटनेचे नियंत्रण आहे. त्यामुळे या संघटनेने आगामी बैठकीत तेल उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतल्यास खनिज तेलाचे दर कमी होतील.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

संबंधित बातम्या:

पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्याने मोदी सरकारची ‘दिवाळी’; सरकारी तिजोरीत 1.71 लाख कोटींची भर

देशातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 120 रुपये तर डिझेल 110 रुपयांपलीकडे; जाणून घ्या कारण

गाडीतील डिझेल संपलंय, पेट्रोल पंपावर जाण्याचीही गरज नाही; ‘ही’ कंपनी करणार होम डिलिव्हरी

Non Stop LIVE Update
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....
एसटी बँकेच्या संचालकपदाबाबत सदावर्ते दाम्पत्याला मोठा दणका
एसटी बँकेच्या संचालकपदाबाबत सदावर्ते दाम्पत्याला मोठा दणका.