Aadhaar Card नाही हे तर ATM, विना तारण मिळवा 10 हजारांचे कर्ज, असा करा अर्ज
Aadhaar Card Loan : जर तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीत पैशांची गरज असेल तर तुम्ही आधार कार्ड मदत घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला नॉन बँकिंग वित्तीय संस्था NBFC आणि फिनटेक प्लेटफॉर्मचे ॲप आणि अधिकृत साईटवर जावे लागेल.

अनेकदा अशी परिस्थिती येते की, जेव्हा तुम्हाला अचानक पैशांची गरज पडते. अशावेळी नातेवाईक अथवा मित्रांकडे सुद्धा पैसे मागणे योग्य वाटत नाही. अशी बिकट परिस्थिती ओढावल्यास तुमचे आधार कार्ड हे तुमच्यासाठी एटीएम कार्ड ठरू शकते. आधार कार्डच्या मदतीने तुम्हाला 10,000 रुपयांचे कर्ज सहज मिळू शकते.
या कर्जाचे एक वैशिष्ट्ये म्हणजे हे कर्ज तुम्हाला सहज मिळते आणि ते एका दमात फेडावे लागत नाही, म्हणजे एकरक्कमी फेडावे लागत नाही. तुमच्या सुविधेनुसार हप्त्यात ते तुम्ही फेडू शकता. सोबतच 10 हजार रुपयांच्या या कर्जासाठी कोणतेही तारण अथवा हमी द्यावी लागत नाही. काय आहे कारण…
Aadhaar कार्डवरून कर्ज




आधार कार्डवर 10 हजार रुपयांचे कर्ज मिळते. हे वैयक्तिक कर्ज (Personal Loan) असते. वैयक्तिक कर्जात आधार कार्डशिवाय इतर कोणताही पुरावा मागितल्या जात नाही. ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड मागितल्या जाते. तुमच्या खात्यात लगेचच 10 हजार रुपये जमा करण्यात येतात. जर तुम्ही त्यासोबत पॅनकार्ड सुद्धा दिले तर या रक्कमेत अधिक वाढ होऊ शकते. अधिक कर्ज रक्कम मिळू शकते.
कोण देते आधार कार्डवर कर्ज?
सरकारी बँका Personal Loan फार कमी देतात. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्ही या बँकेकडे पॅन कार्डचा वापर करू शकता. खासगी बँका तुम्हाला दोन कागदपत्रांआधारे सहज कर्ज देऊ शकतात. जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर तुम्ही आधार कार्डच्या मदतीने NBFC (नॉन बँकिंग आर्थिक कंपनी) आणि फिनटेक प्लेटफॉर्मच्या मदतीने पर्सनल लोन घेऊ शकता.
कसा करू शकता अर्ज?
तुम्ही आधार कार्डच्या मदतीने कर्जासाठी अर्ज करू शकता. आधार कार्डच्या मदतीने NBFC (नॉन बँकिंग आर्थिक कंपनी) आणि फिनटेक प्लेटफॉर्मच्या मदतीने वैयक्तिक कर्ज घेऊ शकता. त्यासाठी नॉन बँकिंग वित्तीय संस्था NBFC आणि फिनटेक प्लेटफॉर्मचे ॲप आणि अधिकृत साईटवर जावे लागेल.
कोणाला मिळू शकते कर्ज?
Aadhaar Card च्या मदतीने कर्ज घेण्यासाठी तुमचे वय 21 ते 60 या दरम्यान असायला हवे. यामध्ये तेच लोक अर्ज करू शकतात, जे नोकरदार आहेत. अथवा ज्यांचा स्वत:चा व्यवसाय आहे. तसेच हे कर्ज मिळवण्यासाठी बँकेत खाते असणे आवश्यक आहे.