PM Shram Yogi Mandhan Yojana | मानासह धनही, असंघटित कामगारांना वृद्धपकाळात दिलासा, ही पेन्शन योजना माहिती आहे का?

PM Shram Yogi Mandhan Yojana | असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नशिबी फक्त कष्टच उपसणे नाही तर त्यांना ही उतारवयात सरकार मदतीचा हात पुढे करते. त्यांच्याविषयीची ही योजना माहिती आहे का?

PM Shram Yogi Mandhan Yojana | मानासह धनही, असंघटित कामगारांना वृद्धपकाळात दिलासा, ही पेन्शन योजना माहिती आहे का?
असंघटित कामगारांसाठी पेन्शन योजना
Image Credit source: सोशल मीडिया
कल्याण माणिकराव देशमुख

|

Aug 06, 2022 | 3:07 PM

PM Shram Yogi Mandhan Yojana | सरकार सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबवते. या योजनांचा लाभ तळागळातील, काबाडकष्ट करणाऱ्या गरिबांना (Hard Working Class) मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करते. अशीच एक योजना सरकारने असंघटित कामगारांसाठी आणली आहे. 18 ते 40 वर्ष वयोगटातील कामगारांना या योजनेतंर्गत फायदा मिळणार आहे. असंघटित कामगारांना (Unorganized workers) उतारवयात फायदा मिळावा यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत असंघटित कामगारांना दरमहा 3 हजार रुपये मानधन (honorarium) देण्यात येणार आहे. या योजनेसाठी काही कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. हातावर पोट असणाऱ्या कष्ट वर्गासाठी जणू ही पेन्शन योजनाच आहे म्हणा ना. उतारवयात कामगारांना औषधोपचारासाठी ही रक्कम उपयोगी पडू शकते. त्यासाठी त्यांना आयुष्याच्या संध्याकाळी कष्ट उपासण्याची गरज नाही. प्रधानमंत्री श्रम योगी मानधन (PM Shram Yogi Mandhan Yojana) असे या विशेष कल्याणकारी योजनेचे नाव आहे.

केंद्र सरकार अनेक विशेष कल्याणकारी योजना चालवते. जेणेकरून सर्वसामान्यांना थेट लाभ मिळेल. या सरकारी योजनांमध्ये मनरेगा व्यतिरिक्त प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. या योजनांमध्ये वेगवेगळ्या श्रम वर्गातील लोकांना जीवन जगण्यात दिलासा देण्यासाठी सरकार मदत करते. आज आपण केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजने विषयी माहिती घेऊयात.

काय आहे मानधन योजना

पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना ही सरकारी योजना असून ही योजना वृद्धापकाळात असंघटित क्षेत्रातील कामगार, कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्याचे काम करते. ही योजना केवळ असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आहे आणि ज्यांना पेन्शन किंवा पीएफ सारखे सामाजिक सुरक्षा लाभ घेता येत नाहीत. विशेषत: या योजनेत मजूर, पथारीवाले आणि कष्ट करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांना पेन्शनची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. कष्ट करी जनेतला पेन्शनची सुविधा देण्याचा प्रयत्न या योजनेंच्या माध्यमातून करण्यात येतो.

हे सुद्धा वाचा

60 वर्षांनंतर पेन्शन

पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेत नावनोंदणीसाठी 18-40 ही वयोमर्यादा आहे. पंरतू, या योजनेत पेन्शन 60 वर्षानंतरच दिली जाते हे लक्ष्यात घेण्यासारखे आहे. ज्या लोकांचे मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांपर्यंत आहे. ते या योजनेसाठी पात्र आहेत. या योजनेअंतर्गत अर्जदाराला 3000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते. पण ही योजना पूर्णपणे ऐच्छिक आहे. त्यामुळे ज्यांनी नाव नोंदणी केलेली नाही. त्या कामगारांना या योजनेतंर्गत सुविधा मिळणार नाहीत. या पेन्शन योजनेत सहभागी व्हायचे आहे की नाही हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन संबंधित अधिकाऱ्याकडून माहिती घ्यावी लागते आणि पेन्शन योजनेत नोंदणी करावी लागते. योजनेतंर्गत वयाच्या 60 व्या पेन्शनची तरतूद आहे. म्हणजे कामगाराला 60 व्या वर्षी 3000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळेल.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें