AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SBI Alert! बँकेची ही सेवा ठप्प, पैशांचे व्यवहार स्थगित, जाणून घ्या काय आहे पर्याय

एसबीआयचे म्हणणे आहे की, ग्राहक इतर डिजिटल पद्धतींद्वारे पैशांचा व्यवहार करू शकतात. इंटरनेट बँकिंग देखील वापरली जाऊ शकते.

SBI Alert! बँकेची ही सेवा ठप्प, पैशांचे व्यवहार स्थगित, जाणून घ्या काय आहे पर्याय
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jul 19, 2021 | 3:21 PM
Share

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ची डिजिटल सेवा प्रदाता योनोकडून व्यवहार ठप्प झाले आहेत. एसबीआयच्या ट्विटर हँडलवर वारंवार वापरकर्ते याबद्दल तक्रारी करत आहेत. एका वापरकर्त्याच्या प्रश्नावर एसबीआयने सांगितले की, सध्या तांत्रिक अडचणीमुळे यूपीआय व्यवहाराद्वारे पैशांचा व्यवहार केला जात नाही. यापूर्वी एसबीआयने आपल्या ग्राहकांना सोशल मीडियाद्वारे सांगितले होते की, देखभाल दुरुस्तीमुळे, यूपीआय, इंटरनेट बँकिंग, योनो अ‍ॅप, योनो लाइट अ‍ॅप इत्यादी सुविधा 2 तास उपलब्ध नाहीत. (SBI Alert, This service of the bank is jammed, money transactions are suspended, know what the options are)

यूपीआय ट्रान्जेक्शनद्वारे पैशाचा व्यवहार ठप्प

एसबीआय बँकेच्या एका युजरने ट्विटरवर आपली समस्या शेअर करताना सांगितले की, योनो अॅपद्वारे आपण यूपीआयकडून पैशाचा व्यवहार करता येत नाही आहे. यावर एसबीआयने प्रतिक्रिया दिली आहे आणि सांगितले की, तांत्रिक समस्येमुळे ही अडचण येत आहे. यावर बँकेची तांत्रिक टीम कार्यरत आहे. आशा आहे की या समस्येचे लवकरच निराकरण होईल.

पर्याय काय?

एसबीआयचे म्हणणे आहे की, ग्राहक इतर डिजिटल पद्धतींद्वारे पैशांचा व्यवहार करू शकतात. इंटरनेट बँकिंग देखील वापरली जाऊ शकते.

आवश्यक माहिती

ऑनलाईन बँकिंगच्या काळात बर्‍याच लोकांनी यूपीआयचा वापर छोट्या मोठ्या पेमेंटसाठी करण्यास सुरूवात केली आहे. आपण एसबीआय ग्राहक असल्यास परंतु यूपीआय डिसेबल करू इच्छित असल्यास, यासाठी बँक शाखेची आवश्यक नाही.

आपण घरी बसून हे काम करू शकता आणि आपण यूपीआय डिसेबल करू शकता. एसबीआय बँकेने एका अधिकृत ट्विटमध्ये म्हटले आहे की, आपण आपली यूपीआय रद्द करू इच्छित असल्यास आपण ऑनलाईन सेवेद्वारे किंवा योनोद्वारे घरी बसून ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.

एसबीआय इंटरनेट बँकिंगवर लॉग इन करा. My Profile सेक्शन ओपन करा. येथे तुम्हाला डिसेबल/इनेबल करण्याचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. तुमचा अकाउंट नंबर निवडल्यानंतर डिसेबल ऑप्शनवर क्लिक करा.

योनो अ‍ॅप लॉगिनच्या माध्यमातून डिसेबल-SBI YONO lite मोबाईल अ‍ॅपवर लॉग इन करा. यूपीआय टॅब ओपन करा. Disable/Enable यूपीआय पर्यायावर क्लिक करा. आपला खाते क्रमांक निवडल्यानंतर, बंद करा.

आपण हे पुन्हा सक्षम करू इच्छित असल्यास आपल्याला सिर्फ टर्न ऑफ ऐवजी टर्न ऑन करावे लागेल. (SBI Alert, This service of the bank is jammed, money transactions are suspended, know what the options are)

इतर बातम्या

IND vs SL: श्रीलंकेला नमवताच टीम इंडिया बनली ‘नंबर 1’, पाकिस्तान, ऑस्ट्रेलियाशी बरोबरी

RD वर सर्वाधिक व्याज देतात ‘या’ बँका, 5 हजार जमा केल्यास वर्षभराने मिळेल भरघोस रक्कम

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?