Todays Petrol Diesel price : सोळाव्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल नाही, जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाच्या किंमती?

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांदरम्यान पेट्रोलियम कंपन्यांनी कोणतीही दरवाढ केलेली नाही. त्यामुळे त्यांना आता इंधनाच्या किंमती वाढवाव्याच लागतील. किंमती न वाढवल्यास त्यांना तोटा सहन करावा लागू शकतो, असं फिच रेटिंगने म्हटलंय.

Todays Petrol Diesel price  : सोळाव्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल नाही, जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाच्या किंमती?
पेट्रोल डिझेलचे दर स्थिर Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 9:09 AM

मुंबई : आज सलग सोळाव्या दिवशी पेट्रोल (Petrol )आणि डिझेलच्या (Diesel) दरात कोणतीही बदल झालेला नाही. सहा एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर (price)  स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत सध्या प्रति बॅरल 108-110 डॉलर आहे. आज दिल्लीत पेट्रोलचा दर 105.41 रुपये इतका आहे. तर मुंबईत 120.51 रुपये आहे. तर कोलकातामध्ये 112.12 रुपये इतका पेट्रोलचा दर आहे. चेन्नईमध्ये 110.85 रुपये प्रति लिटर पेट्रोलचा दर आहे. डिझेलच्या किंमतींबद्दल बोललल्यास डिझेलचा दर दिल्लीत 96.67 मुंबईत 104.77 रुपये आहे. कोलकात्यात 99.83 प्रति लिटर इतका आहे. तर 100.94 रुपये प्रति लिटर इतका दर चेन्नईत आहे. नोएडामध्ये पेट्रोलची किंमती 105.41 रुपये आणि डिझेलची किंमत 96.97 रुपये प्रति लिटर आहे. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर दबाव आहे. सध्या ते 105 डॉलरच्या जवळ आहे.

कंपन्यांना फटका

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार मार्च तिमाहीत किमतीत वाढ न केल्याचा फटका IOC, BPCL, HPCL सारख्या कंपन्यांना सहन करावा लागणार आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे या तेल विपणन कंपन्यांनी 137 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नाही. 10 मार्च रोजी निवडणुकीचे निकाल आले आणि 2 मार्चपासून दरवाढ सुरू झाली. 6 एप्रिलपर्यंत राजधानी दिल्लीत पेट्रेल 10 रुपयांनी महागले होते. त्यानंतर त्यात कोणताही बदल झालेला नाही.

कच्चे तेल महागणार ?

फिच रेटिंगने आपल्या ताज्या अहवालात म्हटलंय की, तेल विपणन कंपन्यांना किंमत न वाढवण्याचा तोटा सहन करावा लागेल. फिच रेटिंग्सने म्हटले आहे की नोव्हेंबर 2021 ते मार्च 2022 दरम्यान कच्चे तेल सुमारे 27 डॉलरने महाग आहे. या काळांत दर नियंत्रणात आले नसते तर पेट्रोल सुमारे तेरा रुपायंनी महागले असते.

नवे दर कसे बघणार?

आम्ही तुम्हाला सांगतो की इंडियन ऑईलचे ग्राहक आसएसपी सिटी कोड टाकून आणि 9224992249 वर मेसेड पाठवून त्यांच्या मोबईलवरुन पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेऊ शकता. तुम्हाला इंडियन्स ऑइलच्या अधिकृत वेबसाइटवर शहर सापडेल. मॅसेज पाठवल्यानंतर तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर पाठवले जाईल.

पेट्रोलचे दर (प्रति लिटर)

  1. दिल्ली – 105.41 रुपये
  2. मुंबईत – 120.51 रुपये
  3. कोलकाता – 112.12 रुपये
  4. चेन्नई – 110.85 रुपयेचे

डिझेलचे दर (प्रति लिटर)

  1. दिल्ली 96.67 रुपये
  2. मुंबई – 104.77 रुपये
  3. कोलकाता –  99.83 रुपये
  4. चेन्नई – 100.94 रुपये प्रति

इतर बातम्या

Health | उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नारळ पाण्याचा वापर करा, आरोग्याच्या अनेक समस्या दूर राहतील!

Nagpur : नागपूरमध्ये विनाहेल्मेट सरकारी बाबूंवर आजपासून कारवाई, राज्याच्या परिवहन आयुक्तांचे आदेश

Sher Shivraj Review: ‘शेर शिवराज’ची दुमदुमणारी गर्जना; बरंच काही शिकवून जातो प्रतापगडाचा रणसंग्राम

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.