Kirit Somaiya | नलवडे साखर कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा, ईडीला पुरावे दिले : किरीट सोमय्या

| Updated on: Sep 21, 2021 | 4:09 PM

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे पाय अजून खोलात जाण्याची शक्यता आहे. कारण, सोमय्यांनी कागलमधील सर सेनापती साखर कारखान्याबाबत ईडीकडे दिल्यानंतर आज त्यांनी आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याशी संबंधित कागदपत्र दिली आहे.

Follow us on

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे पाय अजून खोलात जाण्याची शक्यता आहे. कारण, सोमय्यांनी कागलमधील सर सेनापती साखर कारखान्याबाबत ईडीकडे दिल्यानंतर आज त्यांनी आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याशी संबंधित कागदपत्र दिली आहे. या दोन्ही कारखान्यात हसन मुश्रीफ आणि परिवाराने बोगस कंपन्यांद्वारे पैसा वळवल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. तसंच हसन मुश्रिफ यांना एक इशारा द्यायलाही सोमय्या विसरले नाहीत.

ज्या बेनामी कंपन्यांकडून त्यांनी किती पैसे घेतले. ते कुठे ट्रान्सफर केले, त्याचा किरीय सोमय्याचा ऑडिट रिपोर्ट आज ईडीला दिला. काही दिवसांपूर्वी सर सेनापती कागलमधील कारखान्याची माहिती दिली होती. आज आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याबाबत माहिती दिली आहे. या कारखान्यात 100 कोटी रुपये कशाप्रकारे आले? असा सवाल यावेळी सोमय्या यांनी केलाय. ज्या कंपन्या बंद झाल्या आहेत त्याच्या नावानं बँकेत खाते उडलं आणि त्यातून कारखान्यात पैसे आले. आप्पासाहेब नलावडे कारखाना ब्रिक्स इंडियाला चालवायला दिला. राज्य सरकारकडूनही ब्रिक्स इंडियाला मदत करण्याचे आदेश देण्यात आले, या सगळ्या प्रकाराचा सातबारा आपण ईडीला दिल्याचं सोमय्यांनी सांगितलं.