Breaking | कल्याण-डोंबिवलीत भाजपला मोठा धक्का, 3 भाजप नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

| Updated on: Nov 22, 2021 | 7:58 PM

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या (KDMC election 2022) आधीच भारतीय जनता पक्षाला जबर धक्का बसला आहे. केडीएमसीत भाजपची (BJP) सत्ता स्थापण करण्यासाठी सर्वोतोपरी तयारी सुरु असताना शिवसेनेने भाजपला दणका दिला आहे.

Follow us on

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या (KDMC election 2022) आधीच भारतीय जनता पक्षाला जबर धक्का बसला आहे. केडीएमसीत भाजपची (BJP) सत्ता स्थापण करण्यासाठी सर्वोतोपरी तयारी सुरु असताना शिवसेनेने भाजपला दणका दिला आहे. भाजपच्या ‘मिशन लोटस’ला आता शिवसेनेकडून ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ने उत्तर देण्यात आलं आहे. भाजपच्या तीन नगरसेवकांनी (Corporaters) शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आज संध्याकाळी पार पडला. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. महेश पाटील, सुनिता पाटील आणि सायली विचारे या तीन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. (3 BJP corporators join Shiv Sena in Kalyan-Dombivali municipal corporation)