4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 30 September 2022 -TV9

| Updated on: Sep 30, 2022 | 9:23 AM

जर धनुष्य बाण चिन्ह गोठवण्यात आल्यास नवीन चिन्हासह निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार राहण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांना सुचना केल्या

Follow us on

काँग्रेस नेते अशोक चव्हान यांनी केलेल्या गौप्यस्फानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. यावेळी शिंदे यांनी, अब वो जमाना गया, असे म्हटलं आहे. तर राज्यातील सत्ता संघर्षातील खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न आता निवडणूक आयोगाकडे गेला आहे. त्यामुळे जर धनुष्य बाण चिन्ह गोठवण्यात आल्यास नवीन चिन्हासह निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार राहण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांना सुचना केल्या. तर रश्मी ठाकरे यांनी ठेंबी नाक्याच्या देवीची आरती केली. तसेच संजय राऊत यांच्या परिवाराची भेट देखिल त्यांनी घेतली. या दरम्यान राज्यातील हे ईडी सरकार डिसेंबरमध्ये कोसळणार असे भाकित नाना पटोले यांनी केलं आहे. तर राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही श्री रामाच्या वनवासा प्रमाणे असल्याचेही ते म्हणाले.