ग्रामपंचायतींचा निकाल, भाजप नंबर वन तर राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांचा पक्ष, यासह पहा 4 मिनिट 24 हेडलाईन्स

| Updated on: Oct 17, 2022 | 7:49 PM

भाजप नंबर वनवर तर राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांचा पक्ष ठरला आहे. तर राष्ट्रवादीने राज्यातील 155 ग्रामपंचायतींमध्ये घड्याळ लावलं आहे.

Follow us on

राज्यातील 1165 ग्रामपंचायतींच्या निकालानंतर भाजप नंबर वनवर असलेला पक्ष असल्याचेच सिद्ध झाले आहे. तर 239 ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता आली आहे. तर शरद पवार, राड ठाकरेंसह इतर अनेकांनी मुरजी पटेल यांची माघार घेतल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान राज्यातील 1165 ग्रामपंचायतींच्या निकालामंध्ये भाजप-शिंदे गट आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस पहायला मिळाली. यावेळी भाजप नंबर वनवर तर राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांचा पक्ष ठरला आहे. तर राष्ट्रवादीने राज्यातील 155 ग्रामपंचायतींमध्ये घड्याळ लावलं आहे. तर राज्याच्या राजकारण कट्टर शत्रू बनलेले उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये नंदूरबारमध्ये युती झाल्याचे समोर येत आहे. येथे जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत सत्तांतर झाले आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाच्या पाठिंब्यावर भाजपच्या सुप्रिया गावित अध्यक्ष बनल्या आहेत.